शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

बदलत्या वातावरणाच्या संशोधनाची माहिती प्रदर्शनात यावी

By admin | Updated: November 19, 2014 01:15 IST

बदलत्या वातावरणाच्या संशोधनाची माहिती प्रदर्शनात यावी

  नाशिक : शेतीला सर्वाधिक फटका हा वातावरण बदलाचा बसतो आहे़ अचानक येणारा पाऊस, गारपीट यामुळे शेतीचे अतोनात नुकसान होत असून, बदलत्या वातावरणाची पूर्वसूचना देणारे तंत्रज्ञान प्रदर्शनातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे, असे मत खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी येथे व्यक्त केले़ 'ुमन सर्र्व्हिस फाउंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स यांच्या वतीने ठक्कर मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कृषिथॉन कृषी प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते़ गेले पाच दिवस सुरू असलेल्या या प्रदर्शनाचा आज समारोप झाला़ यावेळी चव्हाण व उपस्थितांच्या हस्ते उत्कृष्ट सजावटीचा स्टॉल हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रने पटकावला़ तसेच इतर स्टॉलधारकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले़ पाऊस सुरू असतानाही जिल्'ासह राज्यभरातून तसेच इतर राज्यांतील अशा सुमारे तीन लाख शेतकऱ्यांनी प्रदर्शनास भेट दिली व प्रदर्शनात सुमारे ५० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला़ याप्रसंगी आत्मा प्रकल्पाचे सागर खैरनार, औरंगाबाद राष्ट्रवादी कॉँगे्रसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे, आयोजक संजय न्याहारकर, विजय पाटील, साहिल न्याहारकर, भगवान खैरनार, संजय सोनवणे आदि उपस्थित होते़ अखेरच्या सत्रात आज यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कृषी विभागप्रमुख रावसाहेब पाटील यांनी कृषी क्षमता व पोषणमूल्य यावर मार्गदर्शन केले़ तसेच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांना कृषी विज्ञान केंद्राचे हेमराज राजपूत यांनी उत्तरे दिली़ नांदेड येथील व्यंकटेश जोशी व शिवाजी केश्वटवार यांनी सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन केले़