शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कळवणकरांना मिळणार अखंडित वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 00:15 IST

कळवण : शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून, शहरवासीयांना मूलभूत सुविधा कमी पडून नये, तसेच अखंडित वीजपुरवठा व्हावा यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून शहरातील वीज वितरणव्यवस्थेचे गणेशनगर व शिवाजीनगर असे विभाजन करून स्वतंत्र वीज वितरणव्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देगणेशनगर, शिवाजीनगर येथे स्वतंत्र वीज वितरणव्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून, शहरवासीयांना मूलभूत सुविधा कमी पडून नये, तसेच अखंडित वीजपुरवठा व्हावा यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून शहरातील वीज वितरणव्यवस्थेचे गणेशनगर व शिवाजीनगर असे विभाजन करून स्वतंत्र वीज वितरणव्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे.पूर्वी शहरातील वीज वितरण व्यवस्था एकाच ११ केव्ही लाइनद्वारे केली जात होती. एकच ११ केव्ही वाहिनी पूर्ण शहरात असल्याने कुठलेही देखभाल, दुरुस्तीच्या कामामुळे किंवा वितरण व्यवस्थेमध्ये कोणताही बिघाड झाल्यास संपूर्ण शहराचा वीजपुरवठा खंडित केला जात होता. शहराची वाढती लोकसंख्या, वाढलेला परिसर आणि वाढलेली विजेची मागणी तसेच ग्राहकसंख्येमुळे सुरळीत वीजपुरवठा होत नव्हता. यामुळे तक्रारींमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे वीज वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आमदार नितीन पवार आग्रही होते.आढावा व नियोजन बैठकीत वीज वितरणव्यवस्थेबाबत आमदार पवार सतत विचारणा करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात सूचना करीत होते. महावितरणचे कार्यकारी अभियंता टेंभुर्णे व उपकार्यकारी अभियंता अंबाडकर यांनी याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडेप्रस्ताव सादर करून वीज वितरणव्यवस्थेचे नियोजन करण्याचे आश्वासन आमदार पवार यांना दिलेहोते.शहराच्या दोन भागात वाहिनीची विभागणीवरिष्ठ कार्यालयाने किमान उपकरणे व साहित्य वापरून कमीतकमी खर्चात वीज वितरणची दोन भागात विभागणी करून शहरात वीजपुरवठा करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार शहरात गणेशनगर व शिवाजीनगर हे दोन मुख्य भाग करण्यात आले असून, वीज वितरण वाहिनीचीही विभागणी करण्यात आली आहे. वीजपुरवठा काही काळ खंडित झाला तर नागरिक अस्वस्थ होतात. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ऊन-पाऊस व थंडीत विजेच्या खांबावर चढून काम करणे अवघड आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी कळवणकरांना वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विभाजनाचे जोखमीचे काम महावितरणच्या यंत्रणेने केल्यामुळे सुरळीत वीजपुरवठा मिळणार आहे.- कौतिक पगार, गटनेते, कळवण पालिका

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतelectricityवीज