शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

कळवणला विद्यार्थ्यांना आॅनलाइन गृहपाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 00:05 IST

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालय ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे ऐन परीक्षा काळात विद्यार्थ्यांचा अभ्यासक्र म मागे राहू नये, शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कळवण शहरातील आरकेएम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शिक्षकांनी तयार केलेल्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून आॅनलाइन गृहपाठ घेतला जात आहे.

ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

कळवण : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालय ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे ऐन परीक्षा काळात विद्यार्थ्यांचा अभ्यासक्र म मागे राहू नये, शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कळवण शहरातील आरकेएम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शिक्षकांनी तयार केलेल्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून आॅनलाइन गृहपाठ घेतला जात आहे.कोरानाच्या पार्श्वभूमीवर आरकेएम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बंद असले तरी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांचे प्रश्नसंच तयार करून ग्रुपवर अपलोड केले जात आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून डिजिटल पर्याय अवलंबून ३० वर्गांतील २३०० विद्यार्थ्यांना प्रश्नसंच आॅनलाइन दिले जात आहेत. ३१ मार्चपर्यंत शाळा बंद असल्याने आरकेएम विद्यालयातील विद्यार्थ्यांना घरी बसून अभ्यास करता यावा यासाठी इयत्ता पाचवी ते नववी व ११वीच्या सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी इंटरनेट, ईमेल, जीमेलच्या माध्यमातून प्रत्येक वर्ग, तुकडीसाठी वेगवेगळ्या विषयांचे प्रश्नसंच तयार करण्यात येत आहेत आणि ते विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर अपलोड केले जात आहेत. त्यासाठी सर्व वर्ग तुकडीतील विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आले असल्याचे प्राचार्य एल. डी. पगार यांनी सांगितले. विद्यालयाचे तंत्रस्नेही शिक्षक डी. बी. गावीत व बी. पी. वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांची कार्यशाळा घेण्यात आली.सुट्टीच्या कालावधीत वार्षिक परीक्षेच्या आधी विद्यार्थ्यांचे अभ्यासात सातत्य राहावे, त्यांची पूर्वतयारी व्हावी यासाठी विविध विषयांचे प्रश्नसंच गूगल फॉर्म, डब्ल्यू पीएफ, वर्ड या डिव्हॉइसचा वापर करून अपलोड केले जात आहेत व विद्यार्थ्यांचा रोजचा प्रतिसाद घेतला जात आहे.विद्यार्थ्यांना पुढील महिन्यात परीक्षांना सामोरे जायचे आहे. ऐन परीक्षेच्या तोंडावर कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पालकांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करून विद्यार्थ्यांना प्रश्नसंच सोडविण्यासाठी दिले जात आहेत. तसेच पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला जात आहे. - एल. डी. पगार, प्राचार्य

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHomeघर