शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

कळवणला आर.के.एमच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन  गृहपाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 17:12 IST

कोरोना इफेक्ट : शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून डिजीटल पर्याय

कळवण : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालय ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांचा अभ्यासक्र म मागे राहू नये, शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कळवण शहरातील आर. के. एम. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करु न शिक्षकांनी तयार केलेल्या व्हॉटस अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून आॅनलाईन गृहपाठ घेतला जात आहे.कोरानाच्या पार्श्वभूमीवर आर. के. एम माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय बंद असले तरी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांचे प्रश्नसंच तयार करु न ग्रुपवर अपलोड केले जात आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून डिजीटल पर्याय अवलंबून ३० वर्गातील २३०० विद्यार्थ्यांना प्रश्नसंच आॅनलाईन दिले जात आहेत. ३१ मार्चपर्यंत शाळा बंद असल्याने आर .के.एम विद्यालयातील विद्यार्थ्यांना घरी बसून अभ्यास करता यावा यासाठी इयत्ता पाचवी ते नववी व ११ वी च्या सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी इंटरनेट , ईमेल ,जीमेलच्या माध्यमातून प्रत्येक वर्ग तुकडी साठी वेगवेगळ्या विषयांचे प्रश्नसंच तयार करण्यात येत आहेत आणि ते विद्यार्थ्यांच्या व्हाट्सअप ग्रुप वर अपलोड केले जात आहेत. त्यासाठी सर्व वर्ग तुकडीतील विद्यार्थ्यांचे व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आले असल्याचे प्राचार्य एल .डी .पगार यांनी सांगितले . विद्यालयाचे तंत्रस्नेही शिक्षक डी.बी.गावित व बी.पी.वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांची कार्यशाळा घेण्यात आली. सुट्टीच्या कालावधीत वार्षिक परीक्षेच्या आधी विद्यार्थ्यांचे अभ्यासात सातत्य राहावे . त्यांची पूर्वतयारी व्हावी यासाठी विविध विषयांचे प्रश्नसंच गुगल फार्म, डब्ल्यू पीएफ ,गुगल फॉर्म, वर्ड या डिवाइसचा वापर करून अपलोड केले जात आहेत व विद्यार्थ्यांचा रोजचा प्रतिसाद घेतला जात आहे. 

 

टॅग्स :Nashikनाशिक