शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्षबागांवर करपा, डावणीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 22:25 IST

ओझर : निफाड तालुक्यातील गोदाकाठच्या करंजगाव, ओझर, पिंपळगाव, सुकेणा, पालखेड, शिंगवे, म्हाळसाकोरे, भुसे परिसरासह उगाव-शिवडी, खेडे, वनसगाव, सारोळे, नांदुर्डी, सोनेवाडी, नैताळे, रामपूर, कोळवाडी, शिवरे या गावांत विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाले आहे.

ओझर : निफाड तालुक्यातील गोदाकाठच्या करंजगाव, ओझर, पिंपळगाव, सुकेणा, पालखेड, शिंगवे, म्हाळसाकोरे, भुसे परिसरासह उगाव-शिवडी, खेडे, वनसगाव, सारोळे, नांदुर्डी, सोनेवाडी, नैताळे, रामपूर, कोळवाडी, शिवरे या गावांत विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाले आहे.तालुक्यातील द्राक्षबागांसह इतर पिकांचे गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसाने नुकसान केले आहे. त्यामुळे निफाड तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी माजी आमदार अनिल कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोमवारी सायंकाळी निफाड तालुक्यात सुमारे सव्वा तासाहून अधिक काळ पावसाचा जोर होता. या पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादकांना बसत आहे. सद्यस्थितीत द्राक्षबागांच्या छाटणीनंतर द्राक्षबागा पोंगा व फुलोरा अवस्थेत आहे. या अवस्थेत सतत पाऊस होत असल्याने द्राक्षबागेच्या पानांवर व घडांवर करपा, डावणी यासारखे रोग बळावत आहेत. फुलोºयातील द्राक्षमण्यांची गळ अन् घडकूज या पावसाने होत आहे. महिनाभरापासून सतत पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश न मिळाल्याने द्राक्षबागांत असलेल्या मुळ्या बंद पडत आहे. त्याचा परिणाम थेट ओलांड्यावर फांदीला मुळ्या फुटत आहे. नवीन द्राक्षमाल जिरण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे शेतकºयांना दिलासा देणे गरजेचे आहे. त्वरित पंचनामे करावे, अशी मागणीही कदम यांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक