शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
5
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
6
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
7
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
8
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
9
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
10
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
11
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
12
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
13
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
14
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
15
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
16
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
17
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
18
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
20
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी

सायगावी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:32 IST

परिसरात बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. मागील वर्षी एकरी १५ ते २० क्विंटल कपाशी उत्पादन असताना बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे ते घटून एकरी चार क्विंटलपर्यंत आले असून, कपाशी पिकातून नफा तर सोडा झालेला खर्च वसूल होणे अशक्यप्राय होऊन बसले आहे.

सायगाव : परिसरात बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. मागील वर्षी एकरी १५ ते २० क्विंटल कपाशी उत्पादन असताना बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे ते घटून एकरी चार क्विंटलपर्यंत आले असून, कपाशी पिकातून नफा तर सोडा झालेला खर्च वसूल होणे अशक्यप्राय होऊन बसले आहे. जिल्हा अधिकारी व तालुका कृषी अधिकारी येवला यांनी कपाशी पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याने सायगाव, ता. येवला येथे कृषी सहायक ज्ञानदेव हारदे, ग्रामसेवक प्रदीप बोडखे यांनी नुकसानग्रस्त कपाशी शेतीचे छायाचित्र मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून जीपीस प्रणालीवर अपलोड करून पंचनामे सुरू केले आहे. यावेळी आधार कार्ड नंबर बँक खात्याची नोंद करण्यात येत आहे. कपाशीचे अतिशय अल्प उत्पादन निघाल्याने शेतकºयांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. यावेळी भागुनाथ उशीर यांच्या कपाशी पीक शेतावर बोंडअळीग्रस्त कपाशीचे पंचनामे करण्यात आले. याप्रसंगी माजी सरपंच सुनील देशमुख, साहेबराव उशीर, अनिल देशमुख, बबन सोनवणे, सोपान लोहकरे, रमेश पठारे, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. मुखेडला पंचनामे करण्यास सुरुवात मुखेड परिसरात बदलते वातावरण ,सकाळी पडणारे दाट धुके यापासून होणाºया विविध किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकºयांनी महागडी कीटकनाशके फवारली परंतु याचा काही एक उपयोग झाला नाही.  बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे मुखेड,मानोरी बुद्रुक, सत्यगाव, देशमाने येथील शेतकºयांच्या कपाशीचे पीक बोंडअळीच्या प्रादुर्भावाने प्रदूषित झाल्याचं शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे.४प्रशासनाने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून, मुखेड येथेही पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी तलाठी दत्तात्रय टिळे, कृषी सहायक आर. ई. कुºहाडे, सरपंच धनंजय आहेर, ग्रामसेवक जी.एल. गायकवाड तसेच शेतकरी उपस्थित होते. कपाशी पिकाला केलेली मेहनत व्यर्थयेवला : तालुक्यातील कोटमगाव खुर्द येथे मोठ्या प्रमाणात कपाशी पिकाला बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला असून, कपाशी पिकाला केलेली सर्व मेहनत व्यर्थ गेल्याचे चित्र दिसून येत आहे. सततचे बदलत असलेले वातावरण आणि सकाळी पडणाºया दाट धुक्याने शेतकरी पुरता त्रस्त झाला होता. वेळोवेळी महागड्या कीटकनाशकांचा वापर करूनही काही एक उपयोग होत नसल्याने तोंडचा आलेला घास पळाल्याने शेतकºयांमध्ये नाराजी दिसून येत आहे. महसूल विभागाला तातडीने बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या पिकाचा पंचनामा करण्याचे आदेश दिले आहे. उसनवारी करून घेतलेले भांडवल कशाच्या आधारावर परत करायचे फेडायचे ? हा गंभीर प्रश्न सध्या शेतक ºयांसमोर उभा राहिला आहे. यावेळी कृषी सहायक श्रीमती तागड, ग्रामसेवक मच्छिंद्र देशमुख, ईश्वर ढमाले, प्रवीण सोनवणे, हरीश ठाकरे, राजेंद्र कोटमे, सुरेश कोटमे आदी शेतकरी उपस्थित होते.शासनाच्या अपुºया कर्मचारी वर्गामुळे बोंडअळीच्या पंचनाम्याचे काम संथगतीने सुरू असून, शेतकरी गोंधळात सापडला आहे. शासनाने पंचनाम्यासाठी कर्मचारी वाढवावे व शेतकºयांना दिलासा द्यावा.- भागुनाथ उशीर, चेअरमन, येवला तालुका खरेदी-विक्र ी संघ, येवला

टॅग्स :Nashikनाशिकcottonकापूस