भगूर : नाशिक तालुक्यातील विविध गावांत शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या मक्याचे कणसावर लष्करी अळीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला असून, त्यामुळे मक्याचे उत्पादनात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळले असून, शासनाने चौकशी करून बियाणे कंपनीवर कारवाई करून शेतकºयांना भरपाई द्यावी, अशी मागणी राहुरीचे सरपंच संगीता संपत घुगे यांनी केली आहे.तालुक्यातील भगूरजवळील राहुरी, दोनवाडे, वडगाव पिंगळा, लहवित, विंचुरी दळवी, आगसखिंड, पांढुर्ली, वंजारवाडी, शेनित, बेलू, नानेगाव या भागात शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड केली असून, दरवर्षी मुंबई, गुजरात मक्याची निर्यात होऊन शेतकºयांना चांगले उत्पन्न मिळते.या संदर्भात काही शेतकºयांनी बियाणे विक्री दुकानदाराला विचारणा केली असता त्याने यावर्षी जास्त उष्णतेमुळे हा रोग झाल्याचे सांगून त्यास कंपनी जबाबदार नसल्याचे म्हटले आहे. शेतकºयांनी मात्र सिजंटा कंपनीच्या बोगस शुगर ७५ बियाण्यांमुळे नुकसान झाल्याची तक्रार केली असून, शासनाने बियाणे कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संपत घुगे, भिकाजी करंजकर, सुभाष वाघ, संदीप मुठाळ, सोपान रोकडे, पोपट भवार, बहिरू शेळके, संदीप आडके, बाळू ढुबे, दिनकर अहेर, संतोष जुंद्रे, महेंद्र बर्वे, बाळू शिरोळे, नाना शिंदे, यशवंत गायकवाड यांनी केली आहे.केवळ तीन कणसेयंदा शेतकºयांनी सिजंटा कंपनीचे शुगर ७५ या औषधाची फवारणी केली. परंतु बियाण्यात दोष असल्या कारणाने एका झाडाला तीन कणसे आली. मात्र ती भरली नाहीत. उलट झाडाला मोठ्या प्रमाणात लष्करी अळीने वेढले. एक किलो बियाणे पेरणीवर ९० कट्टे मका होत असे ते आता अळीयुक्त ३५ कट्टे होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
भगूर परिसरात मक्यावर ‘लष्करी अळी’चा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 01:14 IST