शहरं
Join us  
Trending Stories
1
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
2
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
3
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
4
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार
5
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
6
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
7
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
8
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
9
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
10
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
12
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
13
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
14
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
15
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
16
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
17
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
18
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
19
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
20
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट

बागलाण शहरासह तालुक्यातील २५ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 01:07 IST

सटाणा : बागलाण तालुक्यात कोरोनाचा फैलाव वाढतच आहे .जायखेडा येथील सर्वाधित बाधित सापडल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत जाऊन सटाणा शहरासह तब्बल २५गावांमध्ये शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे .दरम्यान शुक्र वारी पुन्हा ताहाराबाद येथील एका वृद्धासह महिला बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला असुन ३५ वर बाधितांची संख्या गेली आहे .तर कोरोनाने सात जणांचा बळी घेतला आहे .

सटाणा : बागलाण तालुक्यात कोरोनाचा फैलाव वाढतच आहे .जायखेडा येथील सर्वाधित बाधित सापडल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत जाऊन सटाणा शहरासह तब्बल २५गावांमध्ये शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे .दरम्यान शुक्र वारी पुन्हा ताहाराबाद येथील एका वृद्धासह महिला बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला असुन ३५ वर बाधितांची संख्या गेली आहे .तर कोरोनाने सात जणांचा बळी घेतला आहे .बागलाण तालुक्यात एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचा शिरकाव झाला .नामपूर ग्रामीण रु ग्णालयाचा वैद्यकीय अधिकारी सर्व प्रथम बाधित सापडला .त्या पाठोपाठ सटाणा शहरात त्याचा शिरकाव झाला .येथील पंचायत समितीच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकार्याला तसेच पोलीस उपनिरीक्षकाला कोरोनाची बाधा झाली .त्यानंतर एका प्रतिष्ठित व्यापार्याला बाधा झाल्याने त्याचा मोठ्याप्रमाणात प्रादुर्भाव होऊन सटाणा शहरात सर्वाधिक ३७ जणांना त्याची बाधा झाली तर एका मिहलेचा मृत्यू झाला .त्या पाठोपाठ ग्रामीण भागातील जायखेडा गावात सर्वाधिक बाधित आढळले .बाधित वाहन चालकाच्या अंत्यविधीला गेलेल्या तब्बल ५२ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे वैद्यकीय अहवाला वरून आढळून आले .जायखेडा येथील वाहन चालकासह बाधित डॉक्टर पित्याचा कोरोनाने बळी घेतला .त्याच्या नंतर सोमपूर येथीलडॉक्टर व ठेंगोडा येथील डॉक्टर दाम्पत्याला देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर ताहाराबाद येथे १९ जणांना त्याची लागण झाली .त्यामध्ये ताहाराबाद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला वैद्यकीय अधिकारी कोरोनाने बाधित सापडल्या .तर एक तरु ण कोरोनाचा बळी ठरला .बागलाण मध्ये सटाणा ,ताहाराबाद ,नामपूर ,मुल्हेर ,मुंजवाड ,डांगसौंदाणे ,ब्राम्हणगाव ,लखमापूर ही गावे हॉटस्पॉट ठरले आहेत .बागलाणमध्ये गेल्या साडे तीन महिन्यात सात डॉक्टर आणि एक पोलीस अधिकारी यांना कोरोनाची लागण झाली होती . त्यामध्ये चार खासगी डॉक्टरांचा समावेश आहे .तालुक्यात अखेर पर्यंत १४४ जणांना लागण झाली तर सटाणा ,मुल्हेर ,ताहाराबाद ,तांदुळवाडी ,मळगाव येथील प्रत्येकी एक तर जायखेडा येथील दोन अशा सात जणांचा कोरोनाने बळी घेतला . बाधितांमध्ये सर्वाधित ७५ पुरु षांचा, ५६ महिला ,७ बालके ६ बालिकांचा समावेश आहे .

टॅग्स :Nashikनाशिक