शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मक्यावर अळीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 16:58 IST

ब्राम्हणगाव : येथे खरीप हंगामातील मका पिकावर अळीचे प्रमाण खूपच वाढल्याने उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जून, जुलैसह ऑगस्ट महिन्याचा आठवडा उलटूनही मोठा पाऊस न आल्याने पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे. मोठा पाऊस नसल्यानेच पिकांवर त्याचा परिणाम होत असल्याने पिकांवर अळीचे प्रमाण वाढले आहे.

ठळक मुद्देशेतकरी त्रस्त : आठवडाभरापासून पाऊस न पडल्याने पिकांवर परिणाम

ब्राम्हणगाव : येथे खरीप हंगामातील मका पिकावर अळीचे प्रमाण खूपच वाढल्याने उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जून, जुलैसह ऑगस्ट महिन्याचा आठवडा उलटूनही मोठा पाऊस न आल्याने पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे. मोठा पाऊस नसल्यानेच पिकांवर त्याचा परिणाम होत असल्याने पिकांवर अळीचे प्रमाण वाढले आहे.येथील रानमळा शिवारातील दीपक बाजीराव अहिरे यांच्या शेतात मका पिकाची लागवड केली असून त्यांच्या मका पिकावर तसेच परिसरातील शेतातील पिकांवर अळीचे प्रमाण वाढले आहे. अळी जाण्यासाठी शेतकऱ्यांनी कीटकनाशक औषधे मारली असली तरी, अळी जाण्यासाठी मोठा पाऊसच गरजेचा असल्याचे मका उत्पादक शेतकरी दीपक अहिरे यांनी सांगितले. मका पिकाबरोबरच सोयाबीन, ताग, कोबी, टोमॅटोसह अन्य भाजीपाला पिकांवर अळीने घात केला असून त्यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त बनला आहे.वातावरणातील उष्म्यात वाढगेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणात उष्मा वाढला असून तापमानातही वाढ झाली आहे. पावसाळा संपून अडीच महिने झाले असून अद्याप मोठा पाऊस न पडल्याने काही शेतशिवारातील विहिरींची पाणीपातळीही घटू लागली असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे सावट पसरले आहे. श्रावण महिन्यात पुन्हा मोठ्या पावसाची शक्यता कमी असल्याने पुन्हा चिंतेत भर पडली आहे. शेतकऱ्यांनी शेतात महागडी बियाणे, खते, महागडी औषधे, मशागतीसाठी मोठा खर्च केला आहे. या अळीमुळे आर्थिक संकट उभे राहिल्याने शेतकरी विवंचनेत सापडला आहे.शेतकऱ्यांनी मका पिकावरील अळीला घालवण्यासाठी महागडी औषधे फवारणी केली आहेत. मात्र अद्याप त्याचा परिणाम दिसून येत नाही. आता त्यासाठी मोठ्या पावसाची गरज असून मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.- दीपक अहिरे, मका उत्पादक, ब्राम्हणगाव 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती