शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

लहवितच्या इसमाचा स्वाइन फ्लूने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:21 IST

नाशिक : जिल्ह्यात दिवसेंदिवस स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असून, जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षामध्ये उपचार घेत असलेल्या लहवित येथील इसमाचा सोमवारी (दि़११) उपचारादरम्यान मृत्यू झाला़ भाऊसाहेब त्र्यंबक रेवागडे (४८, रा़ मारुती मंदिराजवळ, लहवित, नाशिक) असे स्वाइन फ्लूने मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे़ त्यांच्यावर चार दिवसांपासून उपचार सुरू होते़

नाशिक : जिल्ह्यात दिवसेंदिवस स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असून, जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षामध्ये उपचार घेत असलेल्या लहवित येथील इसमाचा सोमवारी (दि़११) उपचारादरम्यान मृत्यू झाला़ भाऊसाहेब त्र्यंबक रेवागडे (४८, रा़ मारुती मंदिराजवळ, लहवित, नाशिक) असे स्वाइन फ्लूने मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे़ त्यांच्यावर चार दिवसांपासून उपचार सुरू होते़शरणपूर रोडवरील बाफणा ज्वेलर्स येथे सुरक्षारक्षकाचे काम करीत असलेले रेवागडे यांना आठ दिवसांपासून त्रास जाणवत होता़ त्यांनी यासाठी खासगी रुग्णालयात उपचारही घेतले, मात्र त्रास वाढल्याने त्यांना शुक्रवारी (दि़८) जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ पुणे येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या त्यांच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून, सोमवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला़ दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात सद्यस्थितीत चार रुग्णांवर उपचार सुरू असून त्यामध्ये चार महिला व एका पुरुषाचा समावेश आहे़ यापैकी दोन महिला व एका पुरुषाचा अहवाल निगेटीव्ह आला असून, आज दाखल झालेल्या महिलेचा अहवाल येणे बाकी आहे़ भाऊसाहेब रेवागडे यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, भाऊ, बहिणी असा परिवार आहे. शहरात सुमारे ५० पेक्षा जास्त नागरिकांचा बळी घेतला आहे. नागरिकांनी स्वाइन फ्लूची लक्षणे दिसताच त्वरित तपासणी करावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश जगदाळे यांनी केले आहे.