शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात राजकीय नेत्याला लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 00:42 IST

येवला शहरातील एका ज्येष्ठ राजकीय नेत्याचा अहवाल रविवारी, (दि. १९) पॉझिटीव्ह आला आहे. सदर नेत्याला तत्काळ उपचारांसाठी मुंबईतील रुग्णालयात हलविण्यात आले आहे़ दरम्यान, त्यांच्या संपर्कात आलेले कार्यकर्ते व नागरिक धास्तावले आहेत.

ठळक मुद्देउपचारांसाठी मुंबईला हलविले : एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

येवला : शहरातील एका ज्येष्ठ राजकीय नेत्याचा अहवाल रविवारी, (दि. १९) पॉझिटीव्ह आला आहे. सदर नेत्याला तत्काळ उपचारांसाठी मुंबईतील रुग्णालयात हलविण्यात आले आहे़ दरम्यान, त्यांच्या संपर्कात आलेले कार्यकर्ते व नागरिक धास्तावले आहेत.नाशिक रूग्णालयात कासार गल्लीतील ६७ वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. बाधितांच्या संपर्कातील १७ जणांचे स्वॅब घेतले होते तर रविवारी, २४ जणांचे स्वॅब आरोग्य यंत्रणेन घेतले आहेत. बाधित अ‍ॅक्टिव्ह रूग्णसंख्या २१ आहेत़ २१ बाधितांपैकी नाशिक येथील रुग्णालयात ८, बाभूळगाव येथील अलगीकरण कक्षात ७ तर नगरसूल येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर येथे ६ रूग्ण उपचार घेत आहेत. याबरोबरच बाभूळगाव येथील विलगीकरण कक्षात १८ हायरिस्क संशयित रूग्ण दाखल असल्याची माहिती डॉ. गायकवाड यांनी दिली.दिंडोरी तालुक्यात पाचवा बळीदिंडोरी : तालुक्यात कोरोनाचा प्रार्दूर्भाव सुरूच असून रविवारी लखमापूर येथील एकाचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्याआता पाच झाली आहे. तर रु ग्णांची संख्या १२६ वर गेली आहे. आतापर्यंत ८७ रु ग्णांनी कोरोनावर मत केली असून ३४ जणांवर उपचार सुरू आहे.दोन दिवसांत सहा नव्या रु ग्णाची नोंद झाली आहे.तालुक्यात जवळ पास निम्मे रु ग्ण हे वीस ते चाळीस या वयोगटातील आहे. प्रशासनाने नागरिकांना काळजी घेत नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.ओझरटाऊनशिपला दोन रुग्ण; वाहनांना प्रवेशबंदीओझरटाऊनशिप : येथे कोरोनाचे दोन रु ग्ण आढळल्याने नागरिक धास्तावले आहेत. वसाहतीच्या प्रवेशद्वारावर बाहेरून वसाहतीत प्रत्येक वाहनाची कडक तपासणी केली जात असून तीन व चार चाकीसह अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ओझर ग्रामपंचायतीच्या वतीने गडाख कॉर्नर व धन्वंतरी कॉर्नरकडून गावात येण्यासाठी असलेल्या मुख्य रस्त्यावर वाहनांना बंदी केली आहे़गावातील, बाजारपेठेतील सर्व दुकाने सायंकाळी पाच वाजता बंद करण्यात यावे असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम यांच्याकडून करण्यात आले आहे. पोलीस निरिक्षक भगवान मथुरे यांच्यासह पथकाकडून मास्क लावण्याबाबत सुचना दिल्या जात असून डबल सीट दुचाकीस्वारांवर धडक कारवाई केली जात आहे. प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे़ओझरला आढळले पाच कोरोनाबाधितओझर : येथे कोरोनाचा कहर सुरूच असून, रविवारी सायंकाळपर्यंत ५ नवीन रु ग्ण सापडले तर एचएएलमधील एका कामगाराचा नाशिक येथे खासगी इस्पितळात मृत्यू झाला. त्यामुळे ओझरची रुग्णसंख्या ७७ वर जाऊन पोहोचली आहे.यामुळे नागरिकांत भिती व्यक्त होत आहे़ पाच जणांमध्ये पुण्याहून आलेल्या एचएएलमधील दोघांचा समावेश आहे, तर ओझरमधील तिघांचा समावेश आहे.गावातील पाटील संकुल, गडाख कॉर्नर व बाजारपेठ हे तिन्ही प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहेत. गावातील लोकांना ये-जा करण्यासाठी व दीक्षी, दात्याणे, जिव्हाळे, सुकेणेला जाण्यास मारुती वेस खुली ठेवण्यात आली आहे. विनामास्क फिरणाºया वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. दरम्यान, कुणीही अफवा पसरवू नये तसेच विनाकारण घराबाहेर कुणीही पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.पिंपळगावी एकाचा अहवाल पॉझिटिव्हपिंपळगाव बसवंत : शहरात शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात राजवाडा परिसरातील ३८ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्णसंख्या ६० झाल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी योगेश धनवटे यांनी दिली. शहरातील राजवाडा परिसरातील व्यक्ती चालक असल्याने भाजीपाला वाहतूक प्रवासादरम्यान तो बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याची शक्यता आहे. आरोग्य विभागाने दोन-तीन दिवसांपूर्वी त्याचे स्वब तपासणीसाठी पाठवले होते. शनिवारी रात्री उशिराने प्राप्त झालेल्या अहवालात तो बाधित असल्याचे निष्पन्न झाले. गावात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ११ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. या रु ग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेऊन त्यांना क्वॉरण्टाइन करणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या