शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिका, उपचाराअभावी अर्भकाचा गर्भात मृत्यू, मृत्यूनंतरही अवहेलना; नाशिकमध्ये मातेवर उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 08:00 IST

Mokhada News: एका गर्भवतीसाठी रुग्णवाहिका न आल्याने खासगी वाहनाने त्यांनी बुधवारी खोडाळा आरोग्य केंद्र गाठले. पण डॉक्टरांनी तीन तासांनंतर येथे उपचार शक्य नसल्याचे सांगून पुढील ग्रामीण रुग्णालयात नेण्यास सांगितले. मात्र, रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने दोन तास रखडावे लागले आणि यादरम्यान अर्भकाचा गर्भात मृत्यू झाला.

- रवींद्र साळवेमोखाडा -  एका गर्भवतीसाठी रुग्णवाहिका न आल्याने खासगी वाहनाने त्यांनी बुधवारी खोडाळा आरोग्य केंद्र गाठले. पण डॉक्टरांनी तीन तासांनंतर येथे उपचार शक्य नसल्याचे सांगून पुढील ग्रामीण रुग्णालयात नेण्यास सांगितले. मात्र, रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने दोन तास रखडावे लागले आणि यादरम्यान अर्भकाचा गर्भात मृत्यू झाला. असंवेदनशीलतेचा कळस म्हणजे नाशिक जिल्हा रुग्णालयातून मृत अर्भकासाठी रुग्णवाहिका मिळाली नाही आणि खासगी वाहनासाठी पैसे नव्हते, परिणामी त्या गर्भवतीच्या पतीने मृत अर्भक पिशवीत टाकून ८० किमीचा प्रवास एसटीने करून मोखाड्यातील आपले गाव गाठले अन् अंत्यविधी केला.

जोगलवाडी येथील अविता सखाराम कवर (२६) हिला १० जूनला पहाटे प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या. त्यामुळे कुटुंबीयांनी १०८ वर कॉल केला; परंतु रुग्णवाहिका उपलब्ध झाली. नंतर ११ जूनला सकाळी आशा कार्यकर्तीने १०८ ला कॉल केला, मात्र तेव्हाही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी खासगी वाहनांतून गर्भवतीला नेऊन दुपारी खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. यावेळी येथे उपचार करू, असे डॉक्टरांनी कुटुंबियांना सांगितल्याचे अविता यांचे पती सखाराम यांनी ‘लोकमत’ला सांगितले. परंतु साडेतीन तासांनंतर येथे उपचार शक्य नसल्याचे सांगत साधारण सायंकाळी गर्भवतीला मोखाडा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यास डॉक्टरांनी सांगितले. यादरम्यान खोडाळा केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने आसे येथील उपकेंद्रातून रुग्णवाहिका मागविली. सायंकाळी मोखाडा येथील ग्रामीण रुग्णालयात पोहोचल्यावर गर्भवतीच्या तपासणी दरम्यान बाळाचा पोटातच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आले. तेथील डाॅक्टरांना शस्त्रक्रिया करत मातेचा जीव वाचविला.

सुरुवातीपासूनच वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केल्यानंतर वेळेत उपचार डॉक्टरांनी केले नाहीत. याबाबत जाब विचारल्याने पोलिसांना बोलावून मलाच मारहाण केली.  - सखाराम कवर, गर्भवतीचा पती

दवाखान्यात दाखल केल्यानंतर बाळाचे ठोके होत नव्हते, म्हणून मोखाडा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. परंतु रुग्णवाहिका नसल्याने ती आसे येथून मागविण्यात आली, यातदोन तासांचा वेळ वाया गेला. - अश्विनी मोरे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, खोडाळा 

कारवाईची मागणीखोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भवतीला दाखल केल्यानंतर वेळेत उपचार केले जात नसल्याने गर्भवतीचा पती संतापला होता. मात्र डॉक्टरांनी पोलिसांना बोलावून त्या पतीला मारहाण केल्याचा आरोप तिचा पती सखाराम यांनी केला असून, मारहाण करणाऱ्या पोलिसांसह दोषी डॉक्टरांवर कडक कारवाईची मागणी कुटुंबीयांकडून केली जात आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलpalgharपालघर