शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक वसाहतीत विजेचा लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:34 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील सर्वात मोठी उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदे दुमाला येथील औद्योगिक वसाहतीत ऐन दिवाळीच्या तोंडावर दहा ते पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावाने येथील कारखान्यांच्या उत्पादनात घट होऊ लागली असून यामुळे उद्योजकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

ठळक मुद्देकारखानदारांमध्ये नाराजी : उत्पादनात घट; कोट्यवधींचा फटका

   नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील सर्वात मोठी उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदे दुमाला येथील औद्योगिक वसाहतीत ऐन दिवाळीच्या तोंडावर दहा ते पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावाने येथील कारखान्यांच्या उत्पादनात घट होऊ लागली असून यामुळे उद्योजकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. गोंदे औद्योगिक वसाहतीत अनेक छोटे-मोठे कारखाने असून, या सर्व कारखान्यांचा भार एकाच फीडरवर असल्यामुळे येथील परिसरात काही दिवसांपासून पाच ते दहा मिनिटात वीज खंडित होत आहे. दिवसातून पाच ते सहा वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे कारखान्यांमध्ये यंत्र बिघाड, उत्पादनात घट आदी समस्यांना सामोरे जावे लागत असल्यामुळे येथील उद्योजक अक्षरश: रडकुंडीला आले आहेत. येथे वीज असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती झाली आहे. वेळेवर वीजबिल भरण्यास प्राधान्य दिले जाते; परंतु त्या तुलनेत सुविधा मिळत नसल्याची ओरड उद्योजकांकडून होत आहे. येथील कारखान्यांमध्ये उत्पादन प्रक्रि या सतत चालू असल्यामुळे वीजपुरवठ्याची अत्यंत आवश्यकता असते. तो खंडित झाल्यानंतर उत्पादन प्रक्रि या पुन्हा सुरू करताना हजारो रु पयांचे नुकसान होत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. बाहेर जाणाºया पक्क्या मालाला उशीर होत असून, याचाही अतिरिक्त आर्थिक भुर्दंड उद्योजकांना सहन करावा लागत आहे.सततच्या विजेच्या लपंडावामुळे उत्पादनाच्या खराब मालातही भर पडत असल्याने सर्वात जास्त फटका गोंदे औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांना बसला आहे. त्यामुळे येथील कारखानदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचे यावेळी येथील उद्योजकांनी बोलून दाखविले. विजेच्या लपंडावामुळे काही छोट्या कारखानदारांनी उत्पादन बंद ठेवल्यामुळे येथील कामगारांना दोन दिवस सुट्टीदेखील दिल्याचे कामगारांनी यावेळी सांगितले.