शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकपदी इंदुमती नागरे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 01:03 IST

येथील प्रभाग क्र मांक दहा ‘ड’ जागेसाठी घेण्यात येणाऱ्या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशी अपक्ष उमेदवार दत्ताजी वामन यांनी माघार घेतल्याने भाजपाचे उमेदवार तथा दिवंगत नगरसेवक सुदाम नागरे यांच्या पत्नी इंदूबाई नागरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

सातपूर : येथील प्रभाग क्र मांक दहा ‘ड’ जागेसाठी घेण्यात येणाऱ्या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशी अपक्ष उमेदवार दत्ताजी वामन यांनी माघार घेतल्याने भाजपाचे उमेदवार तथा दिवंगत नगरसेवक सुदाम नागरे यांच्या पत्नी इंदूबाई नागरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. बिनविरोध निवडीचे वृत्त समजताच कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला. नागरे यांची बिनविरोध निवड झाली असली तरी तांत्रिकदृष्ट्या माघारीच्या वेळी संंबंधिताने अर्ज दाखल केल्यानंतरच ही प्रक्रिया अधिकृतरीत्या पूर्ण होईल व त्याचप्रमाणे निवड झाल्याचे अधिकृत प्रमाणपत्र नियोजित मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच २४ जून रोजीच प्रदान करण्यात येणार आहे.महानगरपालिकेच्या सातपूर येथील प्रभाग क्र मांक १० ‘ड’मधील नगरसेवक सुदाम नागरे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर दि. ३० मेपासून निवडणूक प्रक्रि या सुरू झाली. दि. ६ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता.शेवटच्या दिवशी भाजपाकडून दिवंगत नगरसेवक सुदाम नागरे यांच्या पत्नी इंदूबाई यांनी अर्ज दाखल केला होता.बिनविरोध निवडणुकीसाठी भाजपाला शिवसेनेबरोबरच प्रामुख्याने राष्ट्रवादी, काँग्रेसने पाठिंबा दिल्यामुळेच भाजपाचे उमेदवार इंदूबाई नागरे यांची बिनविरोध निवड होऊ शकली. भाजपाने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली होती. केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळेच ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे भाजपा सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाElectionनिवडणूक