शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

इंदिरानगरला तीन घरफोड्यांमध्ये अडीच लाखांचा ऐवज लूटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 13:29 IST

मागील वर्षात तब्बल १६ ते १७ सोनसाखळ्या या पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी ओरबाडल्या. त्यापैकी एकाही चोरट्याला गुन्हे शोध पथकाला अटक करण्यास यश आलेले नाही.

ठळक मुद्देवर्षभरात १६ सोनसाखळ्या हिसकावल्या

नाशिक : मागील काही दिवसांपासून परिसरात सोनसाखळी चोरीपाठोपाठ जबरी चोरी, मारहाण, घरफोड्यांसारखे गुन्हे वाढले असून नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. चोरट्यांनी तीन ठिकाणी घरफोडी करून सुमारे अडीच लाखांचा ऐवज लूटल्याचे उघडकीस आले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मन्वंतर सोसायटीत राहणारे नितेश पाटील (३४) यांच्या १३ क्रमांकाची बंद सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह सुमारे एक लाख तीस हजार रूपयांचा ऐवज लुटल्याची घटना घडली. पाटील हे आपल्या कुटुंबीयांसह शनिवारी (दि.२१) बाहेरगावी गेले होते. आठवडाभरानंतर ते पुन्हा शनिवार (दि.४) घरी परतले असता घराचा कडीकोयंडा तुटलेल्या अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.दुसऱ्या घटनेत पाथर्डीफाट्यावरील अक्षय कॉलनीमधील शिव पॅलेसमधील महेंद्र प्रल्हाद बागुल (३२) यांच्या दुकानाच्या शटरला लावलेली कुलुपे अज्ञात चोरट्यांनी कापून तसेच बनावट किल्लीचा प्रयोग करून खोलत दुकानामध्ये प्रवेश केला. आतमधील काचेचा दरवाजाचेही कुलूप तोडत सुमारे ९५ हजार रूपये किंमतीचा माल लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.तीसºया घटनेत पांडवनगरी परिसरातील श्री तिरु मल कॉम्प्लेसमध्ये राहणारे चंद्रन चंद्रशेखर नायर (२७) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ८ हजारांचे महागडे पाच मनगटी घड्याळे, सिंगापूर डॉलर, युएस डॉलर, आॅस्ट्रेलियन डॉलर, दुबईचे दिरहम, उमानिया, जेरूसलेम, इंडोनेशिया, सौदीचे रियाल, बांग्लादेशाचे टका यासह पाकिस्तान, नेपाळ, मलेशिया या देशांचे छंदरूपी साठविलेले सुमारे ४ हजार रूपयांचे चलन असा एकूण १२ हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची फिर्याद दिली आहे.वर्षभरात १६ सोनसाखळ्या हिसकावल्याचार दिवसांपुर्वीच इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलानगर ते वडाळा दरम्यानच्या शंभरफुटी रस्त्यावर एका रिक्षाचालक व त्याच्या साथीदारांनी मिळून प्रवासी युवकाला बेदम मारहाण करत त्याच्याकडे असलेली दहा हजाराची रोकड, मोबाईल हिसकावून पोबारा केला होता. मागील वर्षात तब्बल १६ ते १७ सोनसाखळ्या या पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी ओरबाडल्या. त्यापैकी एकाही चोरट्याला गुन्हे शोध पथकाला अटक करण्यास यश आलेले नाही. लूटमारीच्या घटना घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एकूणच इंदिरानग पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारीत वाढ झाल्याने पोलिसांच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयRobberyचोरी