शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगर : दोघा लूटारू महिलांसह तीघे अल्पवयीन गुन्हेगार ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 16:25 IST

तीघा चोरट्यांना अंजनेरी येथील एका लॉजमधून तर अल्पवयीन गुन्हेगारांना राजीवनगरमधून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून महागडे मोबाईल, रोकड, दुचाकी असा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे संशयितांना दोन दिवस पोलिस कोठडी

नाशिक : परिसरातील साईनाथनगर चौफुलीवरील एका दुकानातील गल्ल्यावर डल्ला मारणाऱ्या तीघा चोरट्यांसह इंदिरानगर परिसरातून मोबाईल चोरी करणा-या तीघा अल्पवयीन चोरट्यांना इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सापळा लावून अटक केली. तीघा चोरट्यांना अंजनेरी येथील एका लॉजमधून तर अल्पवयीन गुन्हेगारांना राजीवनगरमधून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून महागडे मोबाईल, रोकड, दुचाकी असा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.याबाबत इंदिरानगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुक्र वारी सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास साईनाथ नगर चौफुली लगत असलेल्या भावे प्लास्टो या दुकानात दोन महिला आणि एक पुरु ष बनावट ग्राहक म्हणून आले होते. त्यांनी दुकानात काम करत असलेल्या महिलेला बोलण्यात गुंतवून ठेवत लक्ष विचलीत करून पर्स व गल्लातील तीन हजाराच्या रोकडवर डल्ला मारून पोबारा केला होता. याप्रकरणक्ष इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शोध पथकाने तातडीने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवून गुप्त बातमीदाराकडून माहिती घेण्याचे सुत्रे फिरविली. मिळालेल्या खात्रीशिर माहितीवरून अंजनेरी येथील एका लॉजमध्ये संशियत आरोपी असल्याचे समजले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अंकुश दांडगे, दत्तात्रय पाळदे, राजेश निकम, रियाज शेख, भगवान शिंदे, राजू राऊत, दत्तात्रय गवारे, विमल पाचोरे यांचे पथकाने अंजनेरी गाठले. संशयित लॉजच्या परिसरात पथकाने सापळा रचला. यावेळी संशयित आरोपी सोनाली अर्जुन कांबळे (२८, रा. धर्माजी कॉलनी, शिवाजीनगर) उन्नती कैलास खाडम (३५ रा. सहवासनगर झोपडपट्टी) व त्यांचा साथीदार निलेश उर्फ विकी शशिकांत खंडीजोड (२३ रा. श्रमिकनगर) यांच्या शिताफीने मुसक्या बांधल्या. त्यांची कसून चौकशी केली असता दुकानातून चोरलेली पर्स, तीन हजार रु पयांची रोकड, पाच हजार रूपये किंमतीचा मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली दुुचाकी असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. संशयितांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलिस कोठडी देण्यात आली आहे.दुसºया गुन्ह्यात पोलिसांनी राजीवनगरमधून तीघा अल्पवयीन संशयित बालगुन्हेगारांना मोबाईल चोरीच्या संशयावरून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी कबुली दिली. त्यांच्याकडून महागडे दोन मोबाइल हस्तगत करण्यात आले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटक