इंदिरानगर : प्रभाग क्रमांक ३० मधील रस्ते डांबरीकरण करण्यास सुरुवात झाली असून, त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.प्रभाग क्रमांक तीसमधील काही रस्त्यांचे सुमारे दहा वर्षांपासून डांबरीकरण झाले नव्हते. त्यामुळे जागोजागी रस्त्यांवर खड्डे पडले होते, तर काही ठिकाणी खडीवर आल्याने वाहनधारकांना मार्गक्रमण करणे जिकिरीचे झाले होते.या साऱ्या गोष्टींची दखल घेऊन प्रभागाच्या नगरसेवकांनी लाखो रुपयांचा निधी मंजूर करून रस्त्याचे डांबरीकरणास करण्यास सुरुवात केली आहे. कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघासमोर, युनियन बँक कॉलनी, एकता कॉलनी, महारुद्र कॉलनी, पांडवनगरी, अरुणोदय सोसायटी येथे रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले असून, उर्वरित रस्त्यांचे डांबरीकरण येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
इंदिरानगरला रस्त्यांच्या डांबरीकरण कामाला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 00:14 IST