शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगरला विहिरीत बुडून वृध्देसह तरूण मृत्यूमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 15:06 IST

इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पुरूष व महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

ठळक मुद्देपोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.मृतदेह विहिरीत आढळून आल्याचे फिर्यादीत म्हटले

नाशिक : इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पुरूष व महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.पहिल्या घटनेत मेट्रो झोन गृहप्रकल्पाच्या पाठीमागे असलेल्या काळे यांच्या शेतातील विहिरीत जवळच राहणाऱ्या किरण राजू मोरे (३४) यांचा मृतदेह त्यांचा भाऊ किशोर मोरे यांना तरंगत असल्याचे आढळून आले. त्यांनी घटनेची माहिती तत्काळ इंदिरानगर पोलिसांना कळविली. मयत किरण हा मागील दोन दिवसांपासून घरातून कोणास काहीही न सांगता निघून गेला होता. त्याचा शोध घेत असताना मृतदेह विहिरीत आढळून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास हवालदार भामरे करीत आहेत.दुसऱ्या घटनेत पाथर्डीगावातील स्मशानभूमीजवळ असलेल्या भंडुबरा नावाच्या विहीरीत सीताबाई मुरलीधर गवळी (८०) या वृध्देचा मृतदेह तरंगताना आढळून आला. सीताबाई यांना स्मृतीभं्रशचा आजार होता, त्या मारूती मंदीराजवळ पाथर्डीगावात राहत होत्या. स्मृतीभ्रंश असल्यामुळे त्यांनी विहीरीत उडी घेतल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी वैशाली संतोष शिंदे यांनी पोलिसांनी घटनेची खबर दिली. इंदिरानगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयAccidentअपघात