शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगर सिटी उद्यान भकास

By admin | Updated: January 10, 2016 23:14 IST

उद्यान विभागाचे दुर्लक्ष : नागरिकांकडून संताप व्यक्त; देखभालीची मागणी

इंदिरानगर : सिटी उद्यानाची देखभालीअभावी भकास अवस्था झाली आहे. उद्यान विभागाच्या गलथान कारभाराबद्दल नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. इंदिरानगर परिसरात सहा वर्षांपूर्वी दोन एकर जागेत सिटी उद्यान साकारण्यात आले आहे. याठिकाणी लहान मुलांच्या खेळण्यासाठी स्वतंत्र जागा, तसेच छोटेखानी कार्यक्रमासाठी अ‍ॅम्पीथिएटरही उभारण्यात आले. उद्यानाची आकर्षकता वाढविण्यासाठी परिसरात लॉन्ससह विविध प्रकारच्या शोभिवंत वृक्षांच्या रोपांची लागवडही करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा मिळावा, तसेच दैनंदिन कामकाजात व्यस्त असणाऱ्यांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देताना फेरफटका मारण्यासाठी जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. अशा विविध सोयीसुविधांनी युक्त सिटी उद्यानामुळे इंदिरानगरच्या सौैंदर्यात भरत पडली होती. त्यामुळे येथे विरंगुळा शोधण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसोबतच लहान मुलांना खेळण्यासाठी घेऊन येणाऱ्या पालकांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. मात्र उद्यान विभागाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांचा उद्यानाकडे येणारा ओघ ओसरू लागला आहे. उद्यान विभागाच्या दुर्लक्षामुळे येथे मोठ्या प्रमाणात गाजरगवतही वाढले आहे. उद्यानातील विद्युत रोषणाईत बिघाड झाला असून, काही विद्युत दिवे तुटलेल्या अवस्थेत आहेत. उद्यान परिसरात साचलेला कचरा व घाणीमुळे येथे येणाऱ्या लहान मुलांच्या व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या उद्यानाची बकाल अवस्था झाल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. (वार्ताहर)