शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कठोर निर्बंधांचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 01:29 IST

जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता, गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी  बुधवारपासून काही निर्बंध घालण्यात आलेले आहेत. मात्र नाशिककरांकडून अजूनही बेफिकिरी दाखविली जात असल्याने परिस्थिती सुधारली नाहीच तर प्रसंगी कठोर निर्णय घ्यावे लागतील; असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शुक्रवारी दिला आहे. येत्या रविवारी परिस्थितीचा आढावा घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही मांढरे यांनी जाहीर केले.

ठळक मुद्देरविवारी निर्णय : नागरिकांकडून सातत्याने नियमांचा भंग

नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता, गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी  बुधवारपासून काही निर्बंध घालण्यात आलेले आहेत. मात्र नाशिककरांकडून अजूनही बेफिकिरी दाखविली जात असल्याने परिस्थिती सुधारली नाहीच तर प्रसंगी कठोर निर्णय घ्यावे लागतील; असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शुक्रवारी दिला आहे. येत्या रविवारी परिस्थितीचा आढावा घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही मांढरे यांनी जाहीर केले.काेरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने जिल्ह्यात सायंकाळी सात वाजल्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळून बाजारपेठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याबाबतचा आढावा  जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्यानंतर चिंता व्यक्त केली. सण, समारंभ तसेच बाजारपेठेतील गर्दी नियंत्रित करण्यासाठी काही प्रमाणात निर्बंध लावण्यात आलेले आहेत. मात्र गेल्या तीन दिवसांपासून नागरिकांचे स्वैर वागणे सुरूच असल्याचे दिसून येते. नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन असेच होत राहिले तर कठोर निर्णय घ्यावेच लागतील, असे स्पष्ट संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.n मांढरे यांनी सांगितले की,      मागील वर्षी कोरोनाशी लढत   नाशिक जिल्हा सावरत असताना पुन्हा एकदा काेरोनाचे संकट उभे राहिले आहे. गतवर्षीपेक्षा वाईट अवस्थेत हा आजार समोर उभा असताना नागरिकांचे वागणे मात्र स्वैर झाल्याचे दिसत आहे. वास्तविक संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याचा सर्वांत सोपा आणि प्रभावी मार्ग असताना आपण जिल्ह्यात केवळ काही निर्बंध आणले आहेत. n मागील लॉकडाऊनचा अनुभव लक्षात घेता नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि अर्थचक्रही सुरू राहिले पाहिजे, या हेतूने  केवळ गर्दी कमी करण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत; परंतु नागरिक त्यास अपेक्षित प्रतिसाद देताना दिसत नाहीत. सद्य:स्थितीत जिल्ह्यात अडीच हजार पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. मृत्यूचा दर दोन टक्के असून तो अजूनही शून्यावर आलेला नाही. म्हणजे रुग्णांवर मृत्यूची टांगती तलवार आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयcorona virusकोरोना वायरस बातम्या