शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

ग्रामीण भागात इंडिया पोस्ट बॅँकेचे पदार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:00 IST

ग्रामीण भागात इंडिया पोस्ट बॅँकेचे पदार्पण झाले असून, गावोगावी खाते उघडण्याचे काम पेपरलेस होऊ लागले आहे. विविध शासकीय योजनांच्या अनुदानासाठी राष्टयीकृत बॅँकेचा खाते क्रमांक लागतो.

सिन्नर : ग्रामीण भागात इंडिया पोस्ट बॅँकेचे पदार्पण झाले असून, गावोगावी खाते उघडण्याचे काम पेपरलेस होऊ लागले आहे. विविध शासकीय योजनांच्या अनुदानासाठी राष्टयीकृत बॅँकेचा खाते क्रमांक लागतो. त्यासाठी ग्रामीण जनतेची अडचण होत होती. आता मात्र ग्रामीण भागात इंडिया पोस्ट बॅँकेचे पदार्पण झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. इंडिया पोस्ट बॅँकेच्या खात्यातील विविध सुविधांमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवहार सुरळीत होण्यास मदत होणार आहे.सध्या शासनस्तरावरील सर्वच अनुदान जवळपास डीबीटीच्या माध्यमातून वितरित केले जाते. ग्रामीण भागातील बँकेचे कमी प्रमाणात असलेल्या जाळ्यांमुळे ग्रामीण भागातील जनतेस बँकेत खाते उघडण्यापासून तर अनुदान प्राप्त होईपर्यंत तारेवरची कसरत करावी लागते. माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी असलेली प्रधानमंत्री मातृत्ववंदन योजना गरोदर तसेच स्तनदा माता यांसाठी वरदान ठरत आहे. पोस्टाने नुकतेच बँकिंगमध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून प्रवेश केला आहे. यात सिन्नर पोस्टाने चांगलीच आघाडी घेतली असून, एका आठवड्यात ६००हून अधिक खाती उघडली गेली आहेत.गर्भवती महिलांस खाते उघडताना अडचण येऊ नये म्हणून सिन्नर तालुक्यातील पाच उपडाकघर तसेच ३० शाखा कार्यालयांमधून गर्भवती माता आपले पेमेंट बँकेमध्ये खाते उघडू शकतात. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडण्यासाठी फक्त आधार व मोबाइल क्रमांक असल्यास केवळ पाच मिनिटांत लाभार्थीचे खाते उघडले जाते. शून्य रुपयात हे खाते उघडता येते व सदर खाते पूर्णपणे पेपरलेस आहे.असून, पासबुक म्हणून नेक्स्ट बँकिंग म्हणून ओळखल्या जाणारे क्विक रिस्पॉन्स कार्ड खातेधारकास देण्यात येते. खातेधारकास मोबाइल बँकिंग अ‍ॅपच्या माध्यमातून आरटीजीएस, एनइफिट, विमा भरणा, बिल पेमेंट्स, यूपीआय यांसारख्या सुविधा तसेच पोस्ट खातेधारक घरबसल्या अ‍ॅपच्या माध्यमातून आरडी, सुकन्या, पीपीएफ यामध्ये पैसे ट्रान्सफर करू शकतो. पोस्टाचे कर्मचारी, अधिकारी यांनीदेखील यासाठी कंबर कसली असून, आपला आवडता पोस्टमन हा आता यापुढे मोबाइल व बायोमेट्रिकद्वारे खातेधारकाच्या घरी टपाल वितरण दरम्यान पोस्टाच्या बँकेचे खाते उघडण्यास येऊ शकतो. त्यानंतर १५५२९९ या टोल फ्री क्र मांकावर फोन केल्यास चक्क पोस्टमन खातेधारकाच्या घरी पैसे जमा करणे किंवा पैसे अदा करण्यास जाणार आहे. ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी यांनी शासकीय अनुदान प्राप्त करण्यासाठी मोठ्या संख्येने इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी) खाते उघडण्याचे आवाहन सहायक अधीक्षक संदीप पाटील, सिन्नरचे पोस्टमास्तर आर. व्ही. परदेशी व अमोल गवांदे यांनी केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकbankबँक