शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय हितरक्षक सभेची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:20 IST

अल्पवयीन मुली व महिलांवर बलात्काराच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ भारतीय हितरक्षक सभेच्या वतीने ‘शर्म करो इंडिया आंदोलन’च्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

नाशिक : अल्पवयीन मुली व महिलांवर बलात्काराच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ भारतीय हितरक्षक सभेच्या वतीने ‘शर्म करो इंडिया आंदोलन’च्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात लहान मुलींनीही सहभाग नोंदविला. त्यांच्या हातात ‘शर्म करो, शर्म करो, बलात्कारीओ शर्म करो’, ‘बेटी बचाओ, देश बचाओ’ ‘धर्म के ठेकेदारोंको जुते मारो सालों को’ अशा विविध घोषणा लिहिलेल्या फलकांनी लक्ष वेधून घेतले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, देशात दररोज ९२ महिलांवर बलात्कार होत असून, ही आकडेवारी पोलीस दप्तरात नोंद असलेल्या गुन्ह्यांची आहे, परंतु अशा अनेक घटना आहेत की, पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यास महिला धजावत नाहीत. महिलांवर होणाºया वाढत्या अन्याय अत्याचाराच्या घटनांमुळे दररोज ७२ महिला आत्महत्या करीत असल्याचे समोर आले आहे. काश्मीरच्या कथुआ येथे आठ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार व हत्या करण्यात आली तर उत्तर प्रदेशमध्येही एका मुलीवर बलात्कार करून तिच्या वडिलांचा खून करण्यात आला आहे. गुजरातमध्ये ११ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. या सर्व घटना पाहता पोलिसांकडून आरोपींवर कारवाई करण्यातही विलंब केला जात आहे. याप्रकरणी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.आंदोलनात कृष्णा शिंदे, भागवत गांगुर्डे, शरद जाधव, किरण मोहिते, संजय गायकवाड, विकास रोकडे, संदीप कोल्हे, सचिन जाधव, तुषार दोंदे, मंगेश हिरे, नितीन कोळे, किशोर केदारे, सुनील दोंदे, दीपक गांगुर्डे आदी सहभागी झाले होते.खटले तत्काळ निकाली काढावेतदेशभरात विविध ठिकाणी घडलेल्या बलात्काराच्या घटनांत सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, शाळांमध्ये लैंगिक शिक्षण, स्वसुरक्षा याबाबत शिक्षकांद्वारे विद्यार्थ्यांसाठी शिबिरे घेण्यात यावी, शालेय अभ्यासक्रमात महिला अत्याचारासंदर्भातील कायद्याची माहिती देण्यात यावी, महिला व मुलींचा सन्मान करण्याबाबत शाळा व महाविद्यालयातून माहिती देण्यात यावी, बलात्कार करणाºयांना फाशीची शिक्षा होईल, अशी कायद्यात तरतूद करण्यात यावी. बलात्काराचे खटले सहा महिन्यांत निकाली काढावेत आदी मागण्या करण्यात आल्या.

टॅग्स :Kathua Rape Caseकठुआ बलात्कार प्रकरण