’नाशिक : माय आर्मी, माय प्राइड..., भारतीय सेना जिंदाबाद..., भारतीय सेनेने पितृपक्षात विजयादशमी साजरी केली..., मुझे अभिमान है इंडियन आर्मी पर..., पाकिस्तान को मिला करारा जवाब..., पाक मत कर भूल भारत से टकराने की...वरना कारगिल याद है ना? अशा विविध पोस्ट भारतीय सेनेने केलेल्या पाकव्याप्त काश्मीरमधील ‘मिशन सर्जिकल स्ट्राईक’वर माध्यमांमध्ये दिवसभर फि रत होत्या. काश्मीरमधील उरीच्या हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये बस्तान मांडून असलेल्या अतिरेक्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे संकेत दिले होते. लष्करप्रमुखांनी या हल्ल्यानंतर रणनिती आखण्यास सुरूवात केली होती. त्यानुसार भारतीय सेनेने ‘सर्जिकल स्ट्राईक मिशन’ हातात घेत पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर हवाई हल्ला चढविला. या हल्ल्यात भारतीय जवानांनी ३५ दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर कारवाई करण्यात आली असून, याची कल्पना पाकिस्तान सेनेलाही दिल्याची माहिती सेनेचे प्रमुख डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबिर सिंग यांनी दिली आहे.
भारतीय सेना जिंदाबाद...
By admin | Updated: September 30, 2016 02:06 IST