शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"भारत आता लष्करी साधनसामग्री आयात नव्हे तर निर्यात करणारा देश"

By अझहर शेख | Updated: March 18, 2023 17:09 IST

नाशिक रोड तोफखाना केंद्राच्या (आर्टिलरी सेंटर) राज्यस्तरीय दोनदिवसीय ‘नो युवर आर्मी’ या शस्त्रास्त्र प्रदर्शनाच्या उद्घाटनाचे. प्रदर्शनाचे उद्घाटन नितीन गडकरी यांनी आकाशात फुगे सोडून केले.

नाशिक : भारतीय संरक्षण दलाला भासणारी लढाऊ साधनसामग्री परदेशांकडून आयात करावी लागत होती; मात्र मागील सहा ते सात वर्षांपासून भारत देश हा ‘मेक इन इंडिया’अंतर्गत आत्मनिर्भरतेवर भर देत आहे. यामुळे बोफोर्सपेक्षाही जास्त शक्तिशाली अत्याधुनिक ‘धनुष्य’सारखी स्वदेशी तोफेची निर्मिती भारताने केली. आता यासारख्या लष्करी साधनसामग्री अन्य देशांना भारत निर्यात करणारा देश बनत आहे, असे प्रतिपादन भारताचे रस्ते व महामार्ग परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

निमित्त होते, येथील नाशिक रोड तोफखाना केंद्राच्या (आर्टिलरी सेंटर) राज्यस्तरीय दोनदिवसीय ‘नो युवर आर्मी’ या शस्त्रास्त्र प्रदर्शनाच्या उद्घाटनाचे. प्रदर्शनाचे उद्घाटन नितीन गडकरी यांनी आकाशात फुगे सोडून केले. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, गिरीश महाजन, स्कूल ऑफ आर्टिलरीचे कमांडंट लेफ्टनंट जनरल एस. हरिमोहन अय्यर, तोफखाना केंद्राचे ब्रिगेडियर ए. रागेश, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी गडकरी म्हणाले, अशाप्रकारचे लष्करी शस्त्रास्त्र प्रदर्शन भारताच्या युवा पिढीला सैन्यदलात करिअर करण्यासांठी प्रेरणा देणारे ठरते. नाशिक शहर हे विविध लष्करी तळांसाठीदेखील देशभरात प्रसिद्ध आहे. नागपूरप्रमाणेच नाशिकमध्येसुद्धा संरक्षण खात्याच्या साधनसामग्री निर्मितीला भविष्यात वाव आहे. त्यादृष्टीने सरकार नक्कीच प्रयत्नशील राहणार आहे. मेक इन इंडियामुळे देशातील कौशल्यधिष्ठित सुशिक्षित युवकांच्या बुद्धिमत्तेचा फायदा सरकारकडून करून घेतला जात आहे. सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होत आहे.

प्रास्ताविकमधून लेफ्टनंट जनरल एस. हरिमोहन अय्यर म्हणाले, महाराष्ट्र ही वीरांची भूमी राहिली आहे. या भूमीने देशाला नेहमीच शूरवीर योद्धे दिले आहे. भारतीय सैन्यात मराठा वीरांची वेगळी ख्याती आहे. नाशिकचे तोफखाना केंद्र व स्कूल ऑफ आर्टिलरी हे आशियामधील सर्वांत मोठे व महत्वाचे लष्करी केंद्र आहे. या ठिकाणी साडेपाच हजार अग्निवीरांना प्रशिक्षण दिले जात आहे. खासदार गोडसे यांनीही यावेळी कार्यक्रमाचा उद्देश व संकल्पना मनोगतातून सांगितली.अय्यर यांच्या हस्ते लष्करी मानचिन्ह देऊन नितीन गडकरी यांचा सत्कार करण्यात आला. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीNashikनाशिकIndian Armyभारतीय जवान