शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापला रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाला- "त्याच्या हातातून..."
3
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
4
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
5
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
6
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
7
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
9
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
10
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
11
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
12
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
13
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
14
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
15
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
16
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
17
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
18
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
19
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
20
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक

या भारतात बंधुभाव नित्य वसू दे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 00:30 IST

येवला शहर व तालुक्यात प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा झाला. मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. यानिमित्त विविध शाळांमध्ये सांस्कृ तिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

ठळक मुद्देदेशभक्तीचा जागर : येवला तालुक्यात प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात

येवला : येवला शहर व तालुक्यात प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा झाला. मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. यानिमित्त विविध शाळांमध्ये सांस्कृ तिक कार्यक्रम सादर करण्यात आले. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारात शासकीय ध्वजारोहण झाले. प्रारंभी येवला शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी आणि तालुका पोलीस निरीक्षक पाटील यांनी ध्वजाला मानवंदना दिली. यावेळी तहसीलदार रोहिदास वारूळे, नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी संगीता नांदूरकर, आबासाहेब शिंदे, काझी रफिउद्दीन यांच्यासह नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.एन्झोकेम विद्यालयात ध्वजारोहणयेवला येथील सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन्झोकेम विद्यालयात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर क्षत्रिय यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रारंभी एनसीसी पथक, स्काउट-गाइड पथक व विद्यार्थ्यांची शहरातून देशाच्या सामर्थ्याचे दर्शन घडविणाऱ्या चित्ररथासह प्रभातफेरी काढण्यात आली. शहरातील तात्या टोपे, महाराणा प्रताप व छत्रपती शिवराय या महापुरु षांच्या प्रतिमांना ज्येष्ठ विधिज्ञ प्रताप आहेर, प्रा. पुष्पा आहेर, नवनीत राऊत, विलास थोरात तसेच यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर संविधान प्रस्ताविक म्हणण्यात आली. प्राचार्य दत्ता महाले यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे अध्यक्ष पंकज पारख, उपाध्यक्ष रमेशचंद्र पटेल, डॉ. दीपाली क्षत्रिय, संस्थेचे सेक्रेटरी सुशील गुजराथी, संचालक प्रफुल्ल गुजराथी, अशोक शहा, रोशन भंडारी, धनंजय कुलकर्णी, पुरु षोत्तम वर्मा, प्राचार्य संजय नागपुरे, भालचंद्र कुक्कर आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. चंद्रशेखर क्षत्रिय यांनी विद्यालयासाठी ११ हजार रुपयांची, तर शिक्षक बापू कुलकर्णी यांनी विद्यालयात सुरू होत असलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी ११ हजार रुपयांची देणगी दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. उत्सवप्रमुख दत्ता उटवाळे, सुहासिनी शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र गायकवाड यांनी आभार मानले.जिल्हा परिषद शाळा, कोटमगाव खुर्दकोटमगाव खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढली. प्रगतिशील शेतकरी सत्यनारायण सोमासे यांच्या हस्ते व सरपंच नामदेव माळी, जिल्हा दूध संघाचे माजी चेअरमन शरद लहरे, राऊसाहेब आदमाने यांच्या उपस्थितीत अशोक लहरे यांनी ध्वजारोहण केले. मुख्याध्यापक नारायण डोखे यांनी प्रास्ताविक केले. संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. पानिपत येथून मराठवीरांना मानवंदना देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत दीड हजार किमीचा सायकल प्रवास करून आलेले कोटमगाव जगदंबा माता देवस्थानचे व्यवस्थापक राजेंद्र कोटमे व सायकलपटू सचिन भोसले यांचा सत्कार करण्यात आला. जनार्दन कोटमे, नवनाथ कोटमे, गणेश लहरे, प्रकाश शुळ, चांद काद्री, भैया काद्री, निरंजन पुणेकर, दत्तात्रय लहरे, वैभव लहरे, दिलीप घोडेराव, अंबादास पर्वत, गणेश कोटमे, बाबासाहेब लव्हाळे, आदित्य चव्हाण, बापूसाहेब लहरे, विकास लहरे, सौरभ लहरे, काका नारायणे आदी उपस्थित होते. मनोरमा सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले, तर नीलेश पाटील यांनी आभार मानले.राधिका इंग्लिश स्कूल, अंदरसूलअंदरसूल : येथील राधिका इंग्लिश मीडियम स्कूल येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनावणे, माजी सैनिक कचरू साळवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुण किसन धनगे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, झुंझार देशमुख, अमोल देशमुख यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी जवान शरद गायकवाड, रवींद्र वाघचौरे, पृथ्वीराज देशमुख, हरिश्चंद्र थोरात, प्रवीण गाढे, गणेश खैरनार, मच्छिंद्र भालेराव, उत्तम लासुरे, संदीप जेजूरकर, सुदर्शन खिल्लारे उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष भरत धुमाळ, उपप्राचार्य शादाब शेख यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यानंतर विद्यार्थ्यांनी कलाविष्कारांचे सादरीकरण केले. गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. राजश्री गोसावी यांनी सूत्रसंचालन केले, तर आकाश खरास व वैष्णवी क्षीरसागर यांनी आभार मानले.स्वामी मुक्तानंद विद्यालय, येवलाश्री गुरु देव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी मुक्तानंद विद्यालयात जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य समिती सभापती सुरेखा दराडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. सकाळी स्काउट-गाइड, कब-बुलबुल व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी प्रभातफेरी काढली. झाशीच्या राणीची वेशभूषा गीतांजली वडनेरे या विद्यार्थिनीने साकारली. विद्यालयाच्या प्रांगणात संविधान उद्देशपत्रिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. देशभक्तीपर गीतेही सादर करण्यात आली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अमृत पहिलवान, सचिव दीपक गायकवाड, खजिनदार शकुंतला पहिलवान, संचालिका शशिकला फणसे, संजय नागडेकर, डॉ. किरण पहिलवान, प्राचार्य दत्तात्रय नागडेकर, प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी, उपप्राचार्य चांगदेव खैरे, अशोक सोमवंशी, किरण जाधव, मुरलीधर पिहलवान, माजी प्राचार्य चंद्रभान दुकळे, प्रेमचंद पहिलवान, दौलत पाटोळे उपस्थित होते. प्रसाद शास्त्री कुळकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रRepublic Dayप्रजासत्ताक दिन