नाशिक : स्वाइन फ्लू संशयित रुग्णांची वाढती संख्या व जिल्हा रुग्णालयावरील वाढता भार कमी करण्यासाठी जिल्ह्यातील पाच ग्रामीण रुग्णालयांमध्ये स्वतंत्र स्वाइन फ्लू कक्ष तयार करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ गजानन होले यांनी दिले आहेत़ दरम्यान, खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या स्वाइन फ्लू रुग्णांवरील मोफत उपचाराबाबतचे आदेश जिल्हा रुग्णालयास अद्याप प्राप्त झालेले नाही़ नाशिक जिल्ह्यात स्वाइन फ्लू संशयित रुग्णांची संख्या सर्वाधिक असून, ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल होत आहेत़ या रुग्णांना जवळच्या रुग्णालयातच उपचार मिळावेत यासाठी निफाड, चांदवड, मनमाड, कळवण ग्रामीण रुग्णालयांत पाच बेडचे स्वतंत्र कक्ष सुरु होत आहेत.
ग्रामीण रुग्णालयांमध्ये स्वतंत्र स्वाइन फ्लू कक्ष
By admin | Updated: March 4, 2015 01:43 IST