शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
3
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
4
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
5
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
6
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
7
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
9
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
10
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
11
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
12
रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; एकाचा मृत्यू, २६ जण जखमी
13
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
14
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
15
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
16
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
17
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
18
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
19
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
20
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली

मतदान यंत्रांसाठी बांधणार स्वतंत्र गुदामे

By admin | Updated: January 6, 2017 00:21 IST

सहा कोटी खर्च : सिद्धप्रिंपीला जागा

 नाशिक : प्रत्येक निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या मतदान यंत्रांची मतमोजणीनंतर सुरक्षितता अतिशय महत्त्वाची मानली गेली असून, जिल्ह्यात मतदान यंत्रे ठेवण्यासाठी कोणतीच स्वतंत्र व्यवस्था नसल्याने निवडणूक आयोगाने मतदान यंत्रे ठेवण्यासाठी स्वतंत्र गुदामे बांधण्याचे ठरविले असून, त्यानुसार नाशिक तालुक्यातील सिद्धप्रिंपी येथे सुमारे सहा कोटी रुपये खर्च करून गुदाम बांधण्यात येणार आहे. सध्या गेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत वापरली गेलेली मतदान यंत्रे निवडणूक शाखेच्या ताब्यात असली तरी, ती ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने काही मतदान यंत्रे अंबड औद्योगिक वसाहतीतील सेंट्रल वेअर हाउस येथे तर काही मतदान यंत्रे मेरीच्या सभागृहात ठेवण्यात आली आहेत. तालुक्याच्या ठिकाणी असलेली यंत्रेदेखील अशाच खासगी किंवा शासकीय, परंतु अडचणीच्या जागेत ठेवण्यात आलेली आहेत. मेरीचे सभागृह राज्य सरकारच्या अखत्यारित असल्याने त्याच्या वापराचा मोबदला देय नसला तरी, सेंट्रल वेअर हाउससाठी निवडणूक शाखेला भाडे मोजावे लागत आहे. शिवाय दोन्ही ठिकाणांचा ताबा वेगवेगळ्या यंत्रणेकडे असल्याने मतदान यंत्रांची सुरक्षिततेचाही घोळ कायम आहे. (प्रतिनिधी)