येथील तहसील कार्यालयात तहसीलदार संदीप भोसले यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य भास्कर गावित, सभापती विलास अलबाड, नगराध्यक्ष मनोज घोंगे यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस, वनविभाग व होमगार्ड कर्मचाऱ्यांनी ध्वजास मानवंदना दिली.
पंचायत समिती कार्यालयात सभापती विलास अलबाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपसभापती पुष्पा पवार, सदस्य पुष्पा गवळी, तुळशिराम वाघमारे, गटविकास अधिकारी श्रीकांत खताळे यांच्यासह विभागप्रमूख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नगरपंचायत व हुतात्मा स्मारक येथे प्रशासक तथा तहसीलदार संदीप भोसले यांनी ध्वजारोहण केले. तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अरविंद पगारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पेठ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी ध्वजारोहण केले. डॉ. दादासाहेब बिडकर महाविद्यालयात प्राचार्य आर. बी. टोचे, तर डॉ. विजय बिडकर विद्यालयात मुख्याध्यापक राजेंद्र पाटील यांनी ध्यजारोहण केले. याबरोबर भूमीअभिलेख कार्यालय, वनविभाग, होमगार्ड कार्यालय, भारतीय स्टेट बँक यांच्यासह विविध शासकीय कार्यालये, प्राथमिक, माध्यमिक व आश्रमशाळा, ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.
फोटो - १६ पेठ तहसील
पेठ येथील तहसील कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहणप्रसंगी उपस्थित तहसीलदार संदीप भोसले, भास्कर गावित, विलास अलबाड, मनोज घोंगे, आदी उपस्थित होते.
160821\16nsk_20_16082021_13.jpg
पेठ येथील तहसील कार्यालयात मुख्य शासकिय ध्वजारोहण प्रसंगी उपस्थित तहसीलदार संदिप भोसले, भास्कर गावीत, विलास अलबाड, मनोज घोंगे आदी.