शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

इंदिरानगरला अनधिकृत व्यवसायांचा वाढता विस्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:08 IST

परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यालगतच अनेक ठिकाणी पत्र्याचे शेड टाकून अनधिकृत व्यवसाय सर्रासपणे केले जात असून, त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी आग लागून मोठी दुर्घटना घडली होती. त्याचीच पुनरावृत्ती होऊ नये, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

इंदिरानगर : परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यालगतच अनेक ठिकाणी पत्र्याचे शेड टाकून अनधिकृत व्यवसाय सर्रासपणे केले जात असून, त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी आग लागून मोठी दुर्घटना घडली होती. त्याचीच पुनरावृत्ती होऊ नये, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.इंदिरानगर परिसरात नागपूरच्या धर्तीवर लाखो रुपये खर्च करून वडाळा-पाथर्डी रस्ता तयार करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटेल असे वाटत होते, परंतु या रस्त्यालगत अनधिकृतपणे पत्र्याचे शेड बांधून व्यवसाय सुरू झाल्याने कोंडी दिवसेंदिवस वाढतच आहे.  वडाळा-पाथर्डी रस्त्यालगत इंदिरानगर, साईनाथनगर, विनयनगर, परबनगर, सार्थकनगर, समर्थनगर यांसह विविध उपनगरे आहेत. त्यामुळे दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते, परंतु या रस्त्यालगतच अनेक ठिकाणी मोकळ्या प्लॉटवर पत्र्यांचे शेड बांधून व्यवसाय थाटण्यात आले आहेत. यामध्ये अमृतवर्षा कॉलनीसमोर सुमारे पंधरा ते वीस पत्राच्या शेडमध्ये विविध व्यवसाय आहेत तसेच श्रद्धा विहार कॉलनीच्या प्रवेशद्वाराजवळ आणि शंभरफुटी रस्ता राजीवनगर झोपडपट्टीच्या दोन्ही बाजूस, पेठेनगर रस्त्यावरील संत नरहरी चौक ते पेठेनगर कॉर्नर या रस्त्यावरही सुमारे सात आठ पत्र्याचे शेड बांधून विविध व्यवसाय थाटण्यात आले आहेत. महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता सर्रासपणे व्यवसाय करणाºयांवर अतिक्रमण विभाग कारवाई का करत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तातडीने परिसरातील मुख्य अंतर्गत रस्त्यालगत अनधिकृत पत्र्याचे शेड बांधून व्यवसाय थाटणाºयांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.महापालिकेचे दुर्लक्षआतापर्यंत अनेक वेळा अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये व्यवसाय करण्याच्या ठिकाणी आगी लागलेल्या आहेत, परंतु अद्यापपर्यंत मनपाच्या अतिक्रमण विभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे उलटसुलट चर्चेस उधाण आले आहे, तसेच सदर पत्र्याच्या शेडमधील दुकाने भर लोकवस्तीत असल्याने मोठी दुर्घटना झाल्यास महापालिका प्रशासन जबाबदार राहील, असे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच या शेडमध्ये खाद्यपदार्थ बनविण्याचे व्यवसाय असल्याने पुन्हा दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.