शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

वाढत गेला उत्साह आणि जल्लोष !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 02:04 IST

चुरशीची आणि अश्चित निकाल म्हणून चर्चेत असलेली निवडणूक प्रत्यक्षात मात्र एकतर्फी झाल्याचे स्पष्ट झालेच, परंतु प्रत्येक फेरीनंतर वाढत गेलेल्या मताधिक्याने गोडसे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होत गेला.

नाशिक : चुरशीची आणि अश्चित निकाल म्हणून चर्चेत असलेली निवडणूक प्रत्यक्षात मात्र एकतर्फी झाल्याचे स्पष्ट झालेच, परंतु प्रत्येक फेरीनंतर वाढत गेलेल्या मताधिक्याने गोडसे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होत गेला. सुरूवातीला मतमोजणी सुरू झाल्यानंतर काहीकाळ गोडसे मागे पडले होते. मात्र नंतर जी आघाडी त्यांनी मिळवली त्यात त्यांनी पुन्हा मागे बघितले नाही.पहिल्या फेरीनंतर...या निवडणुकीत नाशिक मतदार संघात १८ लाख ८२ हजार १११ मतदारांपैकी ५९ टक्के म्हणजे ११ लाख, १८ हजार ५२० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराने विजयाचा दावा केला असला तरी, खरी लढत सेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे व राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्यातच झाली. अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे व बहुजन वंचित आघाडीचे पवन पवार यांनी अनुक्र मे तिसऱ्या व चौथ्या क्र मांकावर राहिले. सेनेचे गोडसे यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली त्यांना पहिल्या फेरीत २५००२५ मते मिळाली, तर भुजबळ  यांना १६ हजार ४२० मते मिळाली. पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी गोडसेंनी कायम ठेवली. त्या मानाने अपक्ष माणिकराव कोकाटे हे तिसऱ्या क्र मांकावर कायम राहिले. पहिल्या फेरीत कोकाटे यांना ७२१८, तर पवार यांना २८६८ मते मिळाली.पवारांचा काढता पायदुसºया फेरीत गोडसेंनी आघाडी कायम ठेवत भुजबळ यांच्यापेक्षा २२७०७ मतांनी आघाडी घेतली. गोडसे यांना ४७, ७१२, तर भुजबळ यांना ३३१९४ मते मिळाली. कोकाटे याना १३,२७८, तर पवार यांना ६२१९ मते मिळाली. दुसºया फेरीनंतर बहुजन वंचित आघाडीचे पवन पवार यांनी मतदान केंद्रातून काढता पाय घेतला. त्यानंतर पक्षाचे मोजकेच अन्य कार्यकर्ते हजर होते.तिस-या फेरीनंतर..दुपारी साडेबारा वाजता तिसरी फेरी जाहीर करण्यात आली. त्यात ही गोडसेंनी मतांची आघाडी कायम ठेवली. गोडसे यांना ७१,०४८, तर भुजबळ यांना ४८६०० मते मिळाली. कोकाटे यांना २१३९४ व पवार यांना ८७०९ मते मिळाली.नाशिक मतदारसंघात १८ उमेदवार रिंगणात असल्यामुळे मतमोजणी धिम्यागतीने सुरू होती. दुपारी दीड वाजता चौथी फेरी जाहीर करून मतमोजणी कर्मचाऱ्यांना जेवणाची सुट्टी देण्यात आली. या फेरीत गोडसे हे ३५३०२ मतांनी आघाडीवर  राहिले.  गोडसे यांना ९७३१५, तर भुजबळ यांना ६२०१३ मते मिळाली कोकाटे यांना २५७१८ व पवार यांना ११८७२ मते मिळाली.फेरीगणिक वाढले मताधिक्य...नाशिक लोकसभा मतदारसंघात प्रत्येक फेरीनंतर मताधिक्क्य वाढतच गेले त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत गेला. मात्र एक लाखाचा फरक दिसू लागल्यानंतर राष्टÑवादीच्या अनेक कार्यकर्त्यांना सात-आठ फेरीत काय होते नंतर चित्र बदलेल, असा विश्वास होता. त्यामुळे चित्र पालटेल असे ते सातत्याने सांगत होते. परंतु नंतर मात्र असे घडले नाही. फरक वाढतच गेला.लाखाचा फरक...साधारणत: बाराव्या फेरीला मतदानात गोडसे यांना आणखी अनुकूलता दिसू लागली आणि सव्वा लाखाचा फरक गोडसे आणि भुजबळ यांच्यात दिसू लागला. जिवा पांडू गावित वगळता समीर भुजबळ किंवा अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांनी मात्र याठिकाणी भेट दिली नाही.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालnashik-pcनाशिक