शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या शंभर फुटी रस्त्यावर वाढले अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 12:42 IST

वडाळागावातून जाणाºया शंभर फुटी रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या अनधिकृत झोपड्यांमुळे रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम रखडले

ठळक मुद्दे वडाळागावातून जाणाºया शंभर फुटी रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या अनधिकृत झोपड्यांमुळे रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम रखडलेदहा वर्षांपासून झोपडपट्टीलगत असलेल्या दुतर्फा पदपथावर अनेक अनधिकृत झोपड्या तयार

नाशिक : राजीवनगर झोपडपट्टीलगत शंभर फुटी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या पदपथावर अतिक्रमण वाढले असून त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वाढत्या अतिक्रमणातून हा रस्ता मोकळा श्वास घेणार? की ‘सदर पदपथ अनधिकृत झोपड्या आणि टपºयासाठी असून, पादचाºयांसाठी नाही’ असा फलक तरी लावा, अशी उपरोधिक मागणी नागरिकांनी केली आहे.मुंबई-आग्रा महामार्ग व पुणे महामार्गास ये-जा करण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून सुमारे १० वर्षांपूर्वी राजीवनगर झोपडपट्टी, कलानगर, राजसारथी सोसायटी, वडाळागाव, डीजीपीनगर क्रमांक एक या मार्गे शंभर फुटी डीपी रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्यालगत असलेली विविध उपनगरे आणि मुंबई व पुणे महामार्गास ये-जा करण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. वडाळागावातून जाणाºया शंभर फुटी रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या अनधिकृत झोपड्यांमुळे रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम रखडले होते. सुमारे एक महिन्यापूर्वी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवून सुमारे चारशे अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त करून रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. परंतु राजीवनगर झोपडपट्टी एका खासगी जागेत असल्याने त्या ठिकाणी सुमारे १००० झोपड्या आहेत. तेथे झोपड्या उभारण्यास जागा नसल्याने सुमारे दहा वर्षांपासून झोपडपट्टीलगत असलेल्या दुतर्फा पदपथावर अनेक अनधिकृत झोपड्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पादचाºयांना पदपथाअभावी रस्त्यावर जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यामुळे लहान-मोठे अपघातही अनेक वेळेस घडतात. मनपा प्रशासनाकडे अनेक वेळेस तक्रार करूनही अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे सदर पदपथ पादचाºयांसाठी की अनधिकृत झोपडीधारकांसाठी आहे, असा उपरोधिक प्रश्न संतप्त नागरिकांनी केला आहे.