शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक-पुणे महामार्गावर खड्ड्यांमुळे वाढते अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:13 IST

नाशिक-पुणे महामार्गावरील नासर्डी पूल ते दत्तमंदिर सिग्नलपर्यंतच्या महामार्गावर पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले असून, रस्त्यालगतच्या साइडपट्ट्यांमधील मुरूम, माती वाहून गेल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे.

उपनगर : नाशिक-पुणे महामार्गावरील नासर्डी पूल ते दत्तमंदिर सिग्नलपर्यंतच्या महामार्गावर पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले असून, रस्त्यालगतच्या साइडपट्ट्यांमधील मुरूम, माती वाहून गेल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे.  नासर्डी पूल ते दत्तमंदिर सिग्नलपर्यंत पावसाच्या संततधारेमुळे ठिकठिकाणी खड्डे पडले असून, यामुळे वाहतुकीची कोंडी व वाहनांची आदळआपट होऊन नुकसान होत आहे. तसेच महामार्ग रस्त्याच्या साइडपट्ट्यांमधील माती, मुरूम वाहून गेल्याने व बसून गेल्याने साइडपट्टी व रस्त्यामध्ये अंतर निर्माण झाले आहे. तसेच साइडपट्ट्यांमध्ये खाचखळगे तयार झाल्याने त्यामध्ये पावसाचे पाणी साचत आहे. यामुळे दुचाकी चालकांना साइडपट्ट्यांमधील खड्ड्यांचा व साइडपट्टी-डांबरी रस्त्यामधील खोलगट अंतराचा अंदाज येत नसल्याने गाडी स्लिप होऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यामुळे वाहतुकीच्या कोंडीतदेखील भर पडत आहे. मनपा प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासोबत महामार्गाच्या साइडपट्ट्यांमध्ये मुरूम, कच टाकून साइडपट्ट्यांची रस्त्याइतकी लेव्हल करावी, अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.पावसामुळे दुरवस्थानासर्डी पुल ते दत्तमंदिर सिग्नलपर्यंत पावसाच्या संततधारेमुळे ठिकठिकाणी खड्डे पडले असून, यामुळे वाहतुकीची कोंडी व वाहनांची आदळआपट होऊन नुकसान होत आहे. साइडपट्ट्यांमध्ये खाचखळगे तयार झाल्याने त्यामध्ये पावसाचे पाणी साचत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाroad transportरस्ते वाहतूक