शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

बेमोसमी पावसाने शेतकऱ्यांची वाढली चिंता

By admin | Updated: November 22, 2015 23:27 IST

ढगाळ वातावरण : उन्हाळ कांद्याच्या उगवण क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता

मालेगाव : तालुक्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होऊन रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास हलका ते मध्यम स्वरूपाचा बेमोसमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. तालुक्यात तीन ते चार वर्षांपासून सतत दुष्काळ पडत असून, त्यामुळे खरीप वाया जात आहे. त्यात यंदा हीच परिस्थिती राहिली आहे. खरिपाचे उत्पादन नामशेष झाल्याने चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनी रब्बी पीक घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यात सध्या उन्हाळी कांदा लागवड केली जात असताना दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत होते. त्यात रविवारी भर पडली असून सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पावसाला सुुरुवात झाली. हा पाऊस दहा ते पंधरा मिनिटे चालला. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, सर्वत्र रोगट वातावरण तयार झाले आहे. झालेल्या पावसामुळे कांद्याच्या रोपांवर विपरीत परिणाम होऊन उगवणक्षमता कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यात चलबिचल सुरू झाली आहे. दिंडोरी तालुक्यात शनिवारी रात्री झालेल्या अल्प पावसाने शेतकरी वर्गात भीती निर्माण झाली आहे. रविवारी दिवसभर ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागायतदारांची झोप उडाली आहे. ढगाळ वातावरण व पावसाचा शिडकावा, यामुळे द्राक्षबागांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.दिंडोरी तालुक्यात बहुतांशी भागात शनिवारी रात्री आठच्या सुमारास हलक्या स्वरूपचा पाऊस झाला तर वातावरणात बदल होत कधी थंडी कधी उष्णता जाणवत वातावरण अस्थिर बनले असून दिवसभर ढगाळ वातावरण होते. देवळा तालुक्यातील खामखेडा येथे अचानक सायंकाळी ६.३० वाजता वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने शेतमालाचे नुकसान झाले. दुपारी ४ वाजेच्या सुमारास पावसाचे कोणतेही वातावरण नव्हते. परंतु सायंकाळी सहा वाजता अचानक पावसाचे वातावरण होऊन साडेसहा वाजता मुसळधार पावसाला सुरूवात झाली. दिवसभर पावसाचे वातावरण नसल्याने शेतकरी बेसावध राहिला. सध्या लाल कांदा काढणीचा हंगाम असल्याने काढून ठेवलेला कांदा या अवचित आलेल्या पावसामुळे भिजला असून, कांद्याचे नुकसान झाले. तसेच उघड्यावर पडलेले मक्याचे कणसे व उघड्यावर पडलेल्या मका व बाजरीच्या कडब्याचे या पावसामुळे कडबा काळा पडून नुकसान होणार आहे.सध्या रांगडा कांदा लागवडीचा मौसम जोरात आहे. पावसामुळे कांद्याच्या रोपाचे नुकसान होणार आहे .तसेच काही शेतकर्यांनी उन्हाळी कांद्याचे बीयाणे टाकले आहे.तर काही शेतकर्यांनी उन्हाळी कांद्याचे बियाणे नुकतेच उगले आहे आशा रोपाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.तरसाळी : येथे आज सायंकाळी साडे सहा वाजता जोरदार अशा पावसाला सुरवात झाली. गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण होते. अचानक आलेल्या पावसामुळे सायंकाळी गारठ्यातही वाढ झाली होती.दुपारनंतर आकाशात ढगांची गर्दी वाढली होती.या पावसामुळे शेतात काढुन ठेवलेला पावसाळी कांदा, मका, गहू तसेच भाजीपाला पिकाचेही नुकसान झाले. लावणी योग्य उन्हाळी कांदा रोपांचेही नुकसान झाले आहे.पावसामुळे शेतकरी वर्गाचे नुकसान झाले आहे.शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके निसर्गाने हिसकावून घेतली आहेत.या बेमोसमी पावसामुळे शेतकर्यांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागणार आहे.ठेगोडा परीसरात सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अर्धा तास पावसाची संततधार झाल्याने शेतकर्याच्या कांदा , दाळींब,मका द्राक्षे .आधी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले .सध्या कांदा लागवड मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने बेमोसमी पाऊसामुळे कांद्यावर करपा रोग पडण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत आज झालेल्या बेमोसमी पाऊसामुळे शेतकर्यानी कांदा लागवडीसाठी तयार करून ठेवलेल्या शेतात पाणी साचल्याने तयार केलेले शेत व लागवडीसाठी आनलेले महागडे कांदा रोपे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे .लोहोणेर : लोहोणेर व परिसरात सायंकाळी पावसाने अचानक जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाची ताराम्बल उडाली. अवकाळी पावसाने कांदा पिकाचे नुकसान होणार असल्याने शेतकरी वर्ग चिंता ग्रस्त असून आसमानी संकटात सापडला आहे. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरु होता. निफाडला झोडपलेनिफाड : शहरासह तालुक्यातील बहुतांश भागाला शनिवारी रात्री बेमोसमी पावसाने झोडपले,तर काही भागात पावसाने अतिशय कमी प्रमाणात हजेरी लावली. निफाड तालुक्यात शनिवारी दिवसभर ढगाळ वातारणानंतर रात्री ११ वाजताच्या सुमारास सुरुवात झालेल्या पावसामुळे परिसरातील द्राक्षबागांसह लागवड सुरू असलेल्या उन्हाळ कांद्याचे नुकासान झाले आहे. दरम्यान रविवारीही दिवसभर ढगाळ वातावरणानंतर संध्याकाळी सहा वाजता रिमझीम पावसाला सुरुवात झाली आहे. दिंडोरी तालुक्यातील पांडाणे परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे द्राक्षिपकालाधोक्यात येण्याचीशक्यता निर्मान झाली आहे. रविवार रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरवात झाली या पावसामुळे डावणी रोगाचा व बुरशीचा धोका या पावसामुळे निर्मान होण्याची भिती निर्माण झाली आहे . अंबानेर, पांडाणे, पुणेगाव अस्वली पाडा, हस्ते दुमाला, पिंपरी या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने परिसरातील द्राक्षबागायतदार धास्तावले आहेत. (वार्ताहर)