नाशिक : नाशिक महानगरात सतत बाराव्या दिवसांनंतरही पावसाची रिपरिप सुरूच असल्याने गोदाकाठावरील पूरग्रस्तांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पूर्णपणे उघड्यावर पडलेले संसार तसेच घरात आलेला गाळ काढून घर धुऊन टाकल्यानंतरही सूर्यदर्शन नसल्याने घर तसेच वाड्यांमधील ओल कायम राहत आहे. वाड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सततच्या भीजपावसामुळे धोका वाढत आहे. दरम्यान, गुरुवार सकाळपासून सराफ आणि भांडीबाजारातील काही दुकानदारांनी त्यांची दुकाने पुन्हा खुली केली असली तरी रस्त्यावरील चिखल, गाळाचा त्रास अद्यापही कायम आहे.महानगरात गत आठवड्याच्या प्रारंभापासून पावसाने नाशिककरांना झोडपून काढले आहे. बुधवारी अत्यल्प काळ सूर्यदर्शन झाल्यानंतर पुन्हा पावसाने गत दोन दिवस रिपरिप सुरूच ठेवली आहे. त्यामुळे जुने नाशिक आणि पंचवटी या दोन्ही भागांतील गोदाकाठावरील पूरग्रस्त रहिवाशांच्या समस्या दूर होण्यातील अडचणी कायम आहेत. घरांमधील गाळ अत्यंत चिकट असल्याने कसाबसा काढला असला तरी घरांमधील ओल कायम आहे. त्यामुळे बहुतांश घरे आणि वाड्यांमध्ये कुबट वासदेखील येत आहे. सूर्यदर्शन झाल्यावरच या घरांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे, तर पावसाची संततधार कायमच राहिल्याने वाड्यांमधील नागरिकांना अद्यापही भीतीच्या छायेतच रहावे लागत आहे.यंदाच्या पूर आणि त्यानंतरच्या सातत्यपूर्ण प्रत्येक वाड्याचे काही ना काही नुकसान झाले आहे. त्यामुळे वाड्यांमध्ये माती पडणे, एखादी बाजू ढासळणे, गळतीमुळे आतील भागाला पूर्ण ओल येण्यासह असुविधांचा सामना करावा लागत आहे. अनेक वाड्यांतील नागरिकांनी तर दोन-चार दिवसांसाठी आपापल्या नातेवाइकांच्या घरी स्थलांतर केले आहे.
पावसाच्या रिपरिपीमुळे पूरग्रस्तांच्या अडचणीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:17 IST
नाशिक महानगरात सतत बाराव्या दिवसांनंतरही पावसाची रिपरिप सुरूच असल्याने गोदाकाठावरील पूरग्रस्तांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पूर्णपणे उघड्यावर पडलेले संसार तसेच घरात आलेला गाळ काढून घर धुऊन टाकल्यानंतरही सूर्यदर्शन नसल्याने घर तसेच वाड्यांमधील ओल कायम राहत आहे. वाड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सततच्या भीजपावसामुळे धोका वाढत आहे.
पावसाच्या रिपरिपीमुळे पूरग्रस्तांच्या अडचणीत वाढ
ठळक मुद्देसराफ बाजारपेठेतील काही दुकाने उघडली