शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे डास, मच्छरांचा वाढला उपद्रव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 23:29 IST

झालेल्या मुसळधार पावसामुळे अजूनही नववसाहत भागातील मोकळ्या भूखंडांवर पावसाचे पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, डास, मच्छर, चिलट्यांचा उपद्रव वाढला आहे तर साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. महापालिकेने परिसरात डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

ठळक मुद्देमालेगाव : साथीच्या आजारांमध्ये वाढ; डास प्रतिबंधक औषध फवारणीची मागणी

मालेगाव : शहर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अजूनही नववसाहत भागातील मोकळ्या भूखंडांवर पावसाचे पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, डास, मच्छर, चिलट्यांचा उपद्रव वाढला आहे तर साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. महापालिकेने परिसरात डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.सोयगावसह जिजामाता उद्यान, कॉलन्यांमधील मोकळ्या भूखंडांवर पावसाचे पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्यावर शेवाळ पसरले असून, त्यात नागरिक टाकत असलेल्या कचऱ्याची भर पडत आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे; मात्र महापालिकेच्या प्रशासनाने याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले आहे. दोन ते तीन महिने उलटूनही परिसरात डास प्रतिबंधक औषधांची फवारणी केली जात नाही. सायंकाळच्या वेळेस डास व मच्छरांचा उपद्रव वाढत असतो. परतीच्या पावसामुळे अनेक मोकळ्या भूखंडांवर गाजर गवताबरोबरच इतर गवत वाढले आहे. डुकरांचा सुळसुळाट वाढला आहे. मोकळ्या भूखंडांवर नागरिक कचरा टाकत असल्याने मोठे ढिगारे साचले आहेत. या घाण-कचरा व साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विद्यार्थी व वृद्धांच्या विकारांमध्ये वाढ झाली आहे. मोकळ्या भूखंडांवर साचलेल्या पाण्यामध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाने औषध फवारणी करावी तसेच पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. दिवसागणिक समस्यांमध्ये वाढ होत आहे. डी.के. चौकातील राजमाता जिजाऊ उद्यानात अजूनही पावसाचे पाणी साचले आहे. यामुळे नागरिकांना उद्यानात जाता येत नाही. उद्यानातील साचलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात डास व मच्छरांची उत्पत्ती होत आहे. या भागातील नागरिक अक्षरश: वैतागले आहेत. उद्यान असून अडचण नसून खोळंबा झाले आहे. उद्यानातील पाण्याचा निचरा करून स्वच्छता मोहीम राबवावी तसेच महापालिका प्रशासनाने नववसाहत भागातील कॉलन्यांकडे लक्ष देऊन धुरळणी व डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून केली जात आहे.कॉलन्यांमधील रहिवाशी हतबलपरतीच्या पावसामुळे कॉलन्यांना जोडणाºया रस्त्यांची चाळण झाली आहे. सर्वच रस्ते उखडल्याने वाहनधारकांना कसरत करीत वाहने हाकावी लागतात तर मोकळ्या भूखंडांवर घाण, कचरा व पावसाचे डबके साचले आहेत. गटारी नसल्याने पावसाच्या साचलेल्या पाण्याचा निचरा होत नाही. महापालिकेच्या प्रभाग व मुख्य कार्यालयात वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून परिसरात फवारणी झालेली नाही. त्यामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. साचलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. नागरिकही मोकळ्या भूखंडांवर कचरा टाकतात. त्यामुळे रोगराई पसरत आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.- दिव्येश बोरसे, नागरिकमहापालिकेला सर्वाधिक महसूल मिळवून देणाºया सोयगाव व नववसाहत कॉलनींच्या नागरी सुविधांकडे मनपा प्रशासनाने सर्रास दुर्लक्ष केले आहे. नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्ते, गटार या मूलभूत सुविधादेखील मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मोकळ्या भूखंडांवर साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे डास, मच्छरांच्या उत्पत्तीत वाढ झाली आहे.- प्रितेश शर्मा, नागरिक

टॅग्स :Healthआरोग्य