शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

दारणा धरणाच्या जलसाठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 12:48 IST

नांदूरवैद्य : इगतपुरीच्या पूर्वभागात असलेल्या नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, नांदगाव बु., जानोरी, कुºहेगाव, बेलगाव कुºहे, गोंदे दुमाला, पाडळी देशमुख आदी ठिकाणी दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेने येथील नद्या-नाले दुथडी भरून वाहत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

नांदूरवैद्य : इगतपुरीच्या पूर्वभागात असलेल्या नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, नांदगाव बु., जानोरी, कुºहेगाव, बेलगाव कुºहे, गोंदे दुमाला, पाडळी देशमुख आदी ठिकाणी दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेने येथील नद्या-नाले दुथडी भरून वाहत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.या संततधारेमुळे ब्रिटिशकालीन असलेल्या दारणा धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली असून, गुरुवारी (दि. १३) ७४०८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली.इगतपुरी तालुक्यासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून संततधार सुरू आहे. दिवसभरात ८७ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे तर २३०५ मिमी विक्र मी पाऊस नोंदविला गेला आहे. वार्षिक सरासरीच्या ९०.०८ टक्के पाऊस पडल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. दारणा धरणातून ७४०८ क्यूसेक तर मुकणे धरणातून ७८१ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असून, पाऊस असाच सुरू राहिला तर टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ करण्यात येईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. दहा आठवड्याच्या कालखंडानंतर पुन्हा एकदा बुधवारपासून पावसाची संततधार सुरू झाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील संततधार पाऊस पडत असल्याने भात खाचरात पाणी साचून नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. भात पिकासाठी पाऊस पोषक असल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र पाऊस असाच सुरू राहिला तर दारणा धरणाबरोबरच मुकणे धरणाच्याही विसर्गात वाढ करण्यात येणार असून, धरणावरील नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी धरण क्षेत्रात जाऊ नये, असा सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.प्रतिक्रि या...धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असून, धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सरासरीच्या तुलनेत धरण भरले असल्याने सद्यस्थितीत सुरू असलेला पाऊस असाच पडत राहिला तर अतिरिक्त फुगवट्याचे पाण्यामुळे सरासरीच्या तुलनेत धरण भरायला वेळ लागणार नाही.- सुरेश जाचक, शाखा अभियंता दारणा धरण

टॅग्स :Nashikनाशिक