शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

येवला तालुक्यात भाजीपाला लागवड क्षेत्रात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 01:01 IST

जळगाव नेऊर : कायम दुष्काळाची झळा सोसणारा तालुका म्हणून येवला तालुक्याकडे बघितले जात होते, पण हळूहळू येथील शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करून पारंपरिक मका, सोयाबीन, कांदा, कपाशी या पिकांबरोबरच कोबी, फ्लॉवर, ढोबळी मिरची, तिखट मिरची, टोमॅटो, कोथंबीर या अल्प पाण्यावर येणाऱ्या भाजीपाला पिकांकडे मोठ्या प्रमाणात तरुण शेतकरी आकर्षित झाल्याने तालुक्याची वेगळी ओळख निर्माण होत आहे.

ठळक मुद्देपारंपरिक पिकात बदल : कोबी, फ्लॉवर, मिरची, टोमॅटो पेरणीत वाढ

जळगाव नेऊर : कायम दुष्काळाची झळा सोसणारा तालुका म्हणून येवला तालुक्याकडे बघितले जात होते, पण हळूहळू येथील शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करून पारंपरिक मका, सोयाबीन, कांदा, कपाशी या पिकांबरोबरच कोबी, फ्लॉवर, ढोबळी मिरची, तिखट मिरची, टोमॅटो, कोथंबीर या अल्प पाण्यावर येणाऱ्या भाजीपाला पिकांकडे मोठ्या प्रमाणात तरुण शेतकरी आकर्षित झाल्याने तालुक्याची वेगळी ओळख निर्माण होत आहे.पूर्वी निफाड, दिंडोरी, कसमा पट्ट्यात शेतकऱ्यांचा भाजीपाला नाशिक, पिंपळगाव बसवंत बाजार समिती काबीज करत होता. पण आता येवला तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, ढोबळी मिरची, कोथिंबीर, तिखट मिरची पिकांची लागवड केल्याने अनेक शेतकऱ्यांचे उत्पादनही सुरू झाल्याने चांगले बाजारभाव मिळाले, तर मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होणार आहे.दिवसेंदिवस तरुण नोकरीच्या मागे न धावता शेती व्यवसायाकडे जोर देत असल्याने अनेक शेतकऱ्यांचे भाजीपाला पिकांचे उत्पादन सुरू झाले असून नाशिकसह राज्य, परराज्यात विक्री करत आहे.चौकट...कमी पाण्यात जास्त उत्पादनसध्या येवला तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने अजूनही विहिरी, नदी-नाले, बोरवेल कोरडी असल्याने पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. पण शेतकऱ्यांनी आपले शेततळे, विहीर या साधनातील थोड्या पाण्यावर ठिबक सिंचन, तुषार सिंचन, मल्चिंग पेपर इत्यादी साधनांचा उपयोग केल्याने कमी पाण्यातही जास्त उत्पादन शेतकरी घेत आहे, त्यामुळे मनुष्यबळ कमी लागत असून मल्चिंग पेपरमुळे औषधांच्या खर्चाबरोबरच तणाचाही बंदोबस्त होत आहे.सुशिक्षित तरुण वळाले शेतीकडेगेली दोन वर्षांपासून कोरोना संसर्ग साथीमुळे अनेक तरुणांच्या नोकऱ्यांवर गदा आल्याने मोठ्या प्रमाणात सुशिक्षित तरुण शेतीकडे वळाले असून शेतात नवनवीन प्रयोग करून, शेतात विविध प्रकारची पिके घेऊन चार पैसे कमावण्यात व्यस्त आहे.नर्सरीमध्ये रोपांची बुकिंगपूर्वी शेतकरी आपल्या शेतात रोपे तयार करून त्यांची लागवड करत होता. आता त्यामध्ये शेतकऱ्यांनी बदल करून नर्सरीमध्ये रोपे बुक करून लागवडीसाठी दिलेल्या तारखेला रोपे मिळत असल्याने शेतकरी त्या पद्धतीने लागवड करत आहे.कोट...दरवर्षी मका, सोयाबीन पिके घेत होतो. यावर्षी या पारंपरिक पिकाबरोबर कोबी आणि मिरचीचे पीक घेतले आहे. मल्चिंग पेपर व ठिबक सिंचन यामुळे कमी पाण्याबरोबर मेहनतीला सोपे जाते. बाजारभाव चांगले मिळाल्यास पुढील पिकांसाठी भांडवल निर्माण होऊन चार पैसे पदरात पडतील.- अनिल चव्हाण, शेतकरी.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती