घोटी : उसंत न दिलेल्या समाधानकारक पावसाने तालुक्यातील धरण साठ्यात चांगली वाढ झाली आहे. तालुक्यात पावसाच्या सरासरीच्या ४३ टक्के पाऊस आतापर्यंत झाला आहे. यावर्षी पाऊस सरासरी ओलांडण्याची शक्यता आहे. आतापर्यंत १ हजार ४५३ मिलीमीटर पाऊस झाल्याने तालुक्यातील धरण साठ्यात भरमसाठ वाढ झाली आहे. गेल्या वर्षी हे धरण १ आॅगष्ट रोजी भरले होते तर यावर्षी पंधरा दिवस आधीच हे धरण भरले आहे. उशिरा पाऊस सुरु होऊनही धरण लवकर भरल्याची किमया वरु णराजाने साधली. यावरून या भागात पावसाचे प्रमाण किती असेल याचा अंदाज येतो. आता या भागातील पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.
त्रिंगलवाडी धरणसाठ्यात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 13:21 IST