शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
3
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
4
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
5
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
6
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
7
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
8
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
9
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
10
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
11
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
12
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
13
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
14
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
15
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
16
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
17
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
18
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
19
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
20
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

लाल कांदा आवकेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 00:46 IST

येवला : सप्ताहात येवला व अंदरसुल मार्केट यार्डवर लाल कांदा आवकेत वाढ झाली. मागणी कमी झाल्याने बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे दिसुन आले.

ठळक मुद्देयेवला : बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण

येवला : सप्ताहात येवला व अंदरसुल मार्केट यार्डवर लाल कांदा आवकेत वाढ झाली. मागणी कमी झाल्याने बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे दिसुन आले.कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आदी राज्यात व परदेशात मागणी सर्वसाधारण होती. सप्ताहात एकुण कांदा आवक ८२२३६ क्विंटल झाली असुन लाल कांद्याचे बाजारभाव किमान ३०० ते कमाल १४४१ रुपये तर सरासरी १००० रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते. तसेच उपबाजार अंदरसुल येथे कांद्याची एकुण आवक ३८४६० क्विंटल झाली. लाल कांद्याचे बाजारभाव किमान ३०० ते कमाल १४७६ तर सरासरी १००० रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते.सप्ताहात गव्हाची आवक टिकून होती तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. गव्हास स्थानिक व्यापारी वर्गाची व देशांतर्गत मागणी सर्वसाधारण राहील्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात गव्हाची एकुण आवक १२८२ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान १५५० ते कमाल १८८१ तर सरासरी १७१५ रुपयांपर्यंत होते.सप्ताहात बाजरीची आवक टिकून होती. तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. बाजरीस स्थानिक व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात बाजरीची एकुण आवक ३५४ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान १२२५ ते कमाल १७०० तर सरासरी १२७० रुपयांपर्यंत होते.सप्ताहात हरभ-याच्या आवकेत व बाजारभावात वाढ झाल्याचे दिसुन आले. हरब-यास व्यापारी वर्गाची मागणी चांगली राहिल्याने बाजारभावात वाढ झाली. सप्ताहात हरभ-याची एकुण आवक २११ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान ३६५० ते कमाल ५०३० तर सरासरी ४८५० रुपयांपर्यंत होते.तुरीच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. तुरीस व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात तुरीची एकुण आवक ६० क्विंटल झाली असून बाजारभाव किमान ५००० ते कमाल ६५०० तर सरासरी ६२०० पर्यंत होते. सप्ताहात सोयाबीनच्या आवकेत व बाजारभावात वाढ झाल्याचे दिसुन आले. सोयबीनला स्थानिक व्यापारी वर्गाची मागणी चांगली राहिल्याने बाजारभावात वाढ झाली. सप्ताहात सोयाबीनची एकुण आवक १३० क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान ४२०० ते कमाल ५८०० तर सरासरी ५३०० रुपयांपर्यंत होते.मकाच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. सप्ताहात मक्याची एकुण आवक १०२३७ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान १३२५ ते कमाल १५१७ तर सरासरी रु. १४६५ प्रति क्विंटल पर्यंत होते. तसेच उपबाजार उपबाजार अंदरसुल येथे मकाची आवक २३१ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान १२०० ते १४५५ तर सरासरी १४०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे होते.

टॅग्स :FarmerशेतकरीMarketबाजार