शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

साथीच्या आजारात वाढ; दवाखान्यांमध्ये गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 01:12 IST

हवामान व ऋतूबदलाच्या परिणामांमुळे नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती कमी होत असून, शहरात विषाणूजन्य आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. सर्दी-पडसे, अंगदुखी, ताप यांसारख्या आजाराचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

नाशिक : हवामान व ऋतूबदलाच्या परिणामांमुळे नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती कमी होत असून, शहरात विषाणूजन्य आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. सर्दी-पडसे, अंगदुखी, ताप यांसारख्या आजाराचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.  शहरातील गावठाण भागासह नव्याने उदयास आलेल्या परिसरातही रुग्णसंख्या वाढत आहे. सिडकोसह जुने नाशिक, वडाळागाव परिसरात डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच चिकुनगुनियासदृश आजारानेही डोके वर काढले आहे. याबरोबरच विषाणूजन्य ताप, सर्दी-खोकला, उलट्या, अतिसार, सांधेदुखीने नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागापुढे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि ऋतूबदलामुळे बिघडलेल्या हवामानाचे मोठे आव्हान आहे. विषाणूजन्य साथीच्या आजारांना पायबंद घालण्यासाठी आरोग्य विभागाला युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागणार आहे.  हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेता डॉक्टरांनी सकस व पौष्टिक आहारावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे. आहारामध्ये फळांचा समावेश करण्यावर भर द्यावा. तसेच बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ढगाळ हवामान तर कधी सूर्यप्रकाश अशा वातावरणामुळे विषाणूजन्य आजारांत वाढ झाली आहे. जुलै महिना उजाडला असून पावसाला अद्याप पाहिजे तशी सुरुवात होत नसल्याने सार्वजनिक आरोग्यही धोक्यात येऊ लागले आहे. नागरिकांनी आरोग्याची योग्य खबरदारी घेण्याची गरज आहे. शुद्ध स्वरूपाचे पाणी पिण्यास प्राधान्य देण्याचा प्रयत्न करावा. रुग्णांनी पाणी उकळून थंड करून प्यावे. सर्दी-खोकला, तापाचा संसर्ग टाळण्यासाठी रुग्णांच्या संपकर् ात येणार नाही, याची नागरिकांनी खबरदारी घेत गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.दंश लहान, धोका मोठा‘क्युलेक्स’, ‘अ‍ॅनॅफिलिस’, ‘एडिस’ या डासांची उत्पत्ती विविध आजारांना निमंत्रण देणारी ठरते. डासांचा दंश जरी लहान असला तरी आजाराचा धोका मात्र मोठा असतो, हे नागरिकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. अ‍ॅनाफिलिस डासामुळे हिवतापाचा (मलेरिया) प्रसार होतो. हे डास स्वच्छ पाण्यात तयार होतात. एडिस डासाच्या प्रादुर्भावामुळे चिकुनगुणिया या आजाराचा प्रसार होतो. या डासाची उत्पत्तीही स्वच्छ पाणीसाठ्यात होते. क्युलेक्स डासांमुळे हत्तीरोगाचा प्रसार होतो. शौचालयाच्या सेफ्टिक टाकी, तुंबलेल्या गटारी, सांडपाण्याचे डबके, नाले यांसारख्य अस्वच्छ पाण्यात या डासांची पैदास होते.आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवून डासांच्या उत्पत्तीला आळा घालावा.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल