शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

गोदावरीच्या पातळीत वाढ : गंगापूर धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 14:14 IST

नाशिक : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पहाटेपासून पावसाचा जोर कायम असल्याने गंगापूर धरणाचा जलसाठा ७५ टक्क्यांवर पोहचला आहे. अवघ्या पंधरवड्यात ५० टक्के धरण भरले असून सकाळी अकरा वाजेपासून सातत्याने धरणातून विसर्ग सुरू आहे. सुरूवातील १५७२ क्यूसेकने विसर्ग करण्यात आला. त्यानंतर पुन्हा तासाभराने ३१४४ क्सूसेकने विसर्ग वाढविला व दूपारी एक वाजता ...

ठळक मुद्दे विसर्ग दूपारी एक वाजता विसर्ग ४७१६ क्यूसेकवर अग्निशामक दलाची यंत्रणा सज्ज गंगापूर धरणाचा जलसाठा ७५ टक्क्यांवर

नाशिक : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पहाटेपासून पावसाचा जोर कायम असल्याने गंगापूर धरणाचा जलसाठा ७५ टक्क्यांवर पोहचला आहे. अवघ्या पंधरवड्यात ५० टक्के धरण भरले असून सकाळी अकरा वाजेपासून सातत्याने धरणातून विसर्ग सुरू आहे. सुरूवातील १५७२ क्यूसेकने विसर्ग करण्यात आला. त्यानंतर पुन्हा तासाभराने ३१४४ क्सूसेकने विसर्ग वाढविला व दूपारी एक वाजता विसर्ग ४७१६ क्यूसेकवर पोहचला आहे. यामुळे गोदावरीच्या पातळीत अचानकपणे वाढ झाली आहे. गोदाकाठालगतच्या रहिवाशांना नाशिक महापालिकेच्या अग्निशामक आपत्ती व्यवस्थापनाकडून सतर्क तेच्या सूचना दिल्या जात आहे. गोदाकाठापासून सुरक्षित अंतरावर स्थलांतरीत होण्याबाबात अग्निशामक दलाकडून आवाहन केले जात आहे. शहरातील सातपूर, पंचवटी, शिंगाडा तलाव, नाशिकरोड, अशा सर्वच उपकेंद्रातील प्रत्येकी एक बंब गोदाकाठाच्या परिसरात धोक्याचा इशारा देत गस्त करत आहे. गंगापूर धरणातून सुरू करण्यात आलेला विसर्ग पंचवटी येथील रामकुंडात दुपारी अडीच वाजेपर्यंत पोहचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुरनियंत्रण कक्षासह जिल्हाधिकारी आपत्ती कक्ष, महापालिका आपत्ती कक्षाला सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

--अग्निशामक दलाची यंत्रणा सज्जकुठल्याहीप्रकारची पुरपरिस्थी किंवा पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक, कृत्रिम आपत्कालीन घटनांना सामोरे जाण्यासाठी नाशिक महापालिका अग्निशामक दलाची यंत्रणा सज्ज असल्याची माहिती शिंगाडा तलाव येथील मुख्यालयाचे उपकेंद्रीय अधिकारी दिपक गायकवाड यांनी दिली. अग्निशामक दलाकडे अत्याधुनिक हायड्रोलिक शिडी, साचलेल्या पाण्याचा उपसा करण्यासाठी डिझेल पंप, झाडे, घरे, वाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये उपयोगात येणारे वुड कटर, स्टील कटर, मेटल कटरही उपलब्ध आहेत. तसेच पूरपरिस्थिती उद्भवल्यास चार रबर बोट, दोन फायबर बोट, लाईफ रिंग, लाईफ जॅकेट, दोरखंड आवश्यकतेनुसार उपलब्ध आहेत. यासोबतच फोल्डींग स्ट्रेचर, फोल्डींग लॅडर, एक्सटेंशन लॅडरचाही यांत्रिक साहित्यसामुग्रीत समावेश आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिकgodavariगोदावरीgangapur damगंगापूर धरणsomeshwar waterfallसोमेश्वर धबधबा