शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

खोडेमाळा भागात डेंग्यू, चिकुनगुण्याच्या रुग्णसंख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:42 IST

जुने सिडको येथील खोडेमाळा भागात डेंग्यू व चिकुनगुण्यासदृश आजाराचे तीन रुग्णं आढळले असून, मनपाच्या कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सिडको : जुने सिडको येथील खोडेमाळा भागात डेंग्यू व चिकुनगुण्यासदृश आजाराचे तीन रुग्णं आढळले असून, मनपाच्या कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याबाबतची माहिती मिळताच प्रभाग सभापतींसह प्रभागाच्या नगरसेवकांनी प्रभागात पाहणी करीत कामकाज करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या. सिडको भागात कामकाज करणाºया मनपाच्या पेस्टकंट्रोल (मलेरिया) विभागावर कोणाचाही धाक नसल्याने या विभागाचे कामकाज मनमानी सुरू असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.  सिडकोत डेंग्यू व चिकुनगुण्यासदृश आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ व कचºयाचे ढीग साचले असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मागील वर्षी तुळजाभवानी चौकात एकाच भागात पन्नासहून अधिक डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढल्यानंतर मनपाच्या वतीने त्या भागात स्वच्छता मोहीम राबवून धूर व औषध फवारणी केली होती. यंदाच्या वर्षीही मनपा अशा ढिसाळ कारभारामुळे खोडेमळा भागात चिकुनगुण्या व डेंग्यूसदृश आजाराची लागण झालेले रुग्णं आढळले असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. सिडको भागात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूसदृश रुग्णसंख्येत वाढ होत असून, खोडेमळा परिसरात डेंग्यू व चिकनगुनिया आजाराचे तीन रुग्णं आढळल्याने याबाबत मंगळवारी प्रभाग सभापती हर्षा बडगुजर तसेच प्रभागाचे नगरसेवक कल्पना पांडे, राजेंद्र महाले, प्रवीण तिदमे यांनी अधिकाºयांना बरोबर घेत सुमारे दोन तास पाहणी दौरा केला. पावसामुळे आरोग्य विभागाचे सफाई कर्मचारी साफसफाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याने ठिकठिकाणी घाण व कचºयाचे ढीग झालेले दिसून येत असून, यामुळे सिडको भागात साथीचे रोग अतिशय तीव्र स्वरूपात पसरत आहे. डासांचे प्रमाणही वाढले असताना संबंधित विभागाकडून धूर व औषध फवारणी केली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. डेंग्यूसदृश, चिकुनगुण्या आजारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.नगरसेवकांची ‘चिखल’वारी...प्रभाग क्रमांक २४ मधील खोडमळ परिसरात डेंग्यूसदृश व चिकुनगुण्या आजाराचे रुग्ण आढळल्याने मंगळवारी सभापती हर्षा बडगुजरसह प्रभागाचे नगरसेवक कल्पना पांडे, राजेंद्र महाले, प्रवीण तिदमे यांनी प्रभागात पाहणी दौरा केला. या पाहणी वेळी खोडमळा परिसरातील मोकळ्या जागेत वाढलेल्या झाडांच्या फाद्यांचा पालापाचोळा तसेच साचलेले पाणी यावर मनपाच्या वतीने फवारणी करण्यात आली. तसेच पाण्याच्या व्हॉल्व्हजवळ झालेला मोठा खड्डा बुजविण्यात आला. यानंतर नगरसेवकांनी त्यांचा मोर्चा हा कर्मयोगीनगरजवळील आव्हाड हॉस्पिटल परिसरात नव्याने वाढलेल्या मेरीडियानगोल्ड व परिसरातील रस्ता तसेच पांगरेमळा, खोडेमळा या भागातील रस्ते पाहणी केली.मनपा अधिका-यांची सारवासारवखोडेमळा परिसरात डेंग्यूसदृश व चिकनगुनिया रुग्ण आढळल्यानंतर सभापती हर्षा बडगुजर व नगरसेवक कल्पना पांडे, राजेंद्र महाले, प्रवीण तिदमे यांनी खोडेमळा व परिसराची पाहणी केल्याने मनपा अधिकारी व कर्मचाºयांनी या भागात कामकाज करून सारवासारव केल्याचे चित्र बघावयास मिळाले.

टॅग्स :dengueडेंग्यूNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका