नाशिक : बांधकाम व्यवसायासाठी माहेरून दहा लाख रुपये आणले नाहीत म्हणून स्वाती पाटील या विवाहितेचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या चौघा संशयितांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने चार दिवसांची वाढ केली आहे़ गंगापूर रोडवरील रामेश्वर कॉलनीत सोमवारी (दि़३०) रात्री ही घटना घडली होती़ या खून प्रकरणी विवाहितेचे सासरे व सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता निवृत्ती पाटील, पती पीयूष पाटील, मामसासरे तुषार साळुंखे, मामसासू संगीता साळुंखे यांना गंगापूर पोलिसांनी अटक केली होती़ या चौघांच्याही पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना शनिवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते़ न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत मंगळवार (दि़६)पर्यंत वाढ केली आहे़ (प्रतिनिधी)
विवाहिता खून प्रकरणातील संशयितांच्या कोठडीत वाढ
By admin | Updated: April 5, 2015 00:28 IST