शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात संसर्गजन्य तसेच साथीच्या रुग्णसंख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 11:26 IST

डेंग्यू, लॅप्टो, गॅस्ट्रो, कॉलरा, टायफॉईड, मलेरिया यांसह सर्दी, ताप, खोकला आदि आजारांचा मोठा प्रार्दुभाव पहायला मिळत आहे.

 

 

नाशिक- थंडीत झालेली वाढ, दुपारी पडणारे कडक उन, मध्येच येणारा पाऊस, शहरात जागोजागी संसर्गजन्स आजारास कारणीभूत ठरणाºया डास, माशांची वाढती उत्पत्ती यामुळे डेंग्यू, लॅप्टो, गॅस्ट्रो, कॉलरा, टायफॉईड, मलेरिया यांसह सर्दी, ताप, खोकला आदि आजारांचा मोठा प्रार्दुभाव पहायला मिळत आहे.जिल्हा रुग्णालयासह सर्व शासकीय रुग्णालयात तसेच खाजगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी दिसत आहे. वातावरणातील वेळोवेळी होणाºया बदलामुळे सर्दी, खोकला, ताप आदी आजारांनी डोके वर काढले आहे. ताप, सर्दी, खोकला आदी आजारांनी त्रस्त रु ग्ण उपचारासाठी खासगी आणि महापालिकेच्या रु ग्णालयांत धाव घेत आहेत.दरम्यान, महापालिका रुग्णालयांत येणाºया रु ग्णांना योग्य उपचार वेळीच मिळावेत, यासाठी काळजी घेतली जाते.महापालिकेच्या आरोग्य विभागाने साफसफाई, फवारणी आदि आपल्या जबाबदाºया पार पाडत नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर नागरिकांनीही डेंग्यूचा फैलाव होऊ नये म्हणून घरातील पाण्याचे साठे नियमीत स्वच्छ करणे, कचरा न करणे आदिंबाबत महापालिकेकडून जनजागृती करण्यात येत आहे. ताप, सर्दी ,खोकल्याचे रु ग्ण अधिक आहेत. उघडयावरील पदार्थ खाणे, शीतपेय यामुळे ताप, सर्दी, खोकला होऊ शकतो. त्यामुळे वाढत्या उकाडयात शीतपेय व उघडयावरील पदार्थ खाणे टाळावे, असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. मलेरिया आणि डेंग्यू पसरण्याचे कारण म्हणजे सर्वत्र मोठया प्रमाणावर होणारी डासांची निर्मिती. ही डासांची पैदास होण्यास महापालिका जशी जबाबदार आहे तसेच नागरिकही जबाबदार आहेत. यात महापालिका जास्त जबाबदार आहे. कारण या शहराच्या स्वच्छतेकडे व रोज शहरात निर्माण होणाºया कचºयाच्या विल्हेवाटीकडे महापालिकेचे अधिकारी आणि नगरसेवक यांनी दुर्लक्ष केले आहे. शहरात रोज अक्षरश: हजारो टन कचरा निर्माण होत आहे. शहरात मोठमोठी बांधकामे होत आहेत व गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत. या इमारतींचे बांधकाम होत असताना तेथे असणारे वाळूचे ढीग, अन्य बांधकाम साहित्य व साठवण्यात येत असलेले पाणी यामुळे डासांची मोठया प्रमाणावर निर्मिती होते. त्यामुळे मलेरिया आणि डेंग्यूसारखे आजार फैलावत आहेत. पण डासांची निर्मिती करणाºया या केंद्रांकडे महापालिका अधिकारी लक्ष देत नाहीत ही वस्तूस्थिती आहे.