कसबे सुकेणे : शहरात व परिसरात गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोºयांच्या संख्येत वाढ झाली असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मौजे सुकेणे येथे इंदूबाई मोगल यांच्या घरी झालेल्या चोरीचा अद्यापही तपास लागला नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. कसबे सुकेणे शहर व परिसरातील मौजे सुकेणे, ओणे भागात गेल्या अनेक दिवसांपासून भुरट्या चोºयांचे सत्र कायम आहे. काही दिवसांपूर्वी मौजे सुकेणे येथे इंदूबाई पांडुरंग मोगल यांच्या घरी चोरट्यांनी भरदिवसा डल्ला मारत रोख रक्कम व सोन्या- चांदीच्या दागिन्यांची जबरी चोरी केली होती. या घटनेला पंधरा दिवस उलटले तरी अद्यापही तपास लागत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. चोरीचा लवकरात लवकर तपास लावावा या आशयाचे निवेदन इंदूबाई मोगल यांनी पोलिसांना दिले आहे.ओझर ठाणे अंकित कसबे सुकेणे पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी कसबे सुकेणे व मौजे सुकेणे परिसरातून होत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कसबे सुकेणे शहर, परिसरात वाढीव बंदोबस्त तैनात करावा, शहरात अनुचित प्रकार व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची दक्षता घेऊन अवैद्य धंदे बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कसबे सुकेणे परिसरात चोºयांच्या घटनांमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:19 IST