शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

दिशादर्शक फलक नसल्याने अपघातात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 18:28 IST

नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा बेलगाव कुऱ्हे ते व्हीटीसी या ८ किलोमीटर असणाऱ्या रस्त्याला दिशादर्शक फलक तसेच विजेची सोय नसल्यामुळे या रस्त्यावर महिनाभरापासून अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. संबंधित विभागाने लक्ष देऊन या ठिकाणी दिशादर्शक फलक तसेच रस्त्यावर िजेची सोय करावी, अशी मागणी व्यावसायिक तसेच नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देनांदूरवैद्य : व्हीटीसी फाटा ते बेलगाव कुऱ्हे रस्ता धोक्याचा

नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा बेलगाव कुऱ्हे ते व्हीटीसी या ८ किलोमीटर असणाऱ्या रस्त्याला दिशादर्शक फलक तसेच विजेची सोय नसल्यामुळे या रस्त्यावर महिनाभरापासून अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. संबंधित विभागाने लक्ष देऊन या ठिकाणी दिशादर्शक फलक तसेच रस्त्यावर िजेची सोय करावी, अशी मागणी व्यावसायिक तसेच नागरिकांनी केली आहे.बेलगाव कुऱ्हे ते व्हीटीसी हा रस्ता नाशिक-मुंबई या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा व सतत रहदारीने गजबजलेला अतिशय महत्त्वाचा समजला जातो. बेलगाव ते व्हीटीसी दरम्यान असलेल्या या रस्त्यावर अनेक वळणदार मार्ग असून रस्त्याच्या दुतर्फा झाडे आहेत. यामुळे या वळणदार असलेल्या ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्याने चालकांना समोरून येणाऱ्या गाडीचा अंदाज येत नाही. परिणामी अपघाताला सामोरे जाण्याच्या घटना वाढत आहेत.दोन दिवसांपूर्वी एक वॅगन आर गाडी या ठिकाणी वीजेची सुविधा नसल्यामुळे पलटी झाली. तसेच हा रस्ता जंगल भागातून जात असल्याने या परिसरात जंगली हिंस्र प्राण्यांचा रात्रीच्या वेळी रस्त्यावर वावर असल्यामुळे या रस्त्याला विजेची सोय करण्यात यावी.ब्रिटिशकालीन असलेल्या दारणा धरणावर जाणारे पर्यटक याच रस्त्याने जात असतात. तसेच परिसरातील व्यावसायिक, औद्योगिक वसाहतींमध्ये रोजगारासाठी जाणारे कामगार रात्रीच्या वेळी जात असतात. शिवाय नाशिकला जाण्यासाठी अतिशय महत्त्वाचा रस्ता असल्याने या रस्त्यावर महिन्याभरापासून अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. या ठिकाणी दिशादर्शक फलक तसेच विजेची सोय करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघात