शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य कर्मचारी मुख्यालयी नसल्याने गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 00:54 IST

सायखेडा : गोदाकाठ भागातील आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र येथे कार्यरत असलेले आरोग्य कर्मचारी कोविड सारख्या महामारीच्या संकटात मुख्यालयी रहात ...

ठळक मुद्देनागरिक संतप्त : कोविड महामारीच्या दरम्यानही उदासिनता

सायखेडा : गोदाकाठ भागातील आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र येथे कार्यरत असलेले आरोग्य कर्मचारी कोविड सारख्या महामारीच्या संकटात मुख्यालयी रहात नाही. अनेक कर्मचारी नाशिकहून ये जा करत असल्यामुळे सायंकाळी पेशंट तपासणी करण्यासाठी गेले असता आरोग्य केंद्र बंद असते त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. आरोग्याच्या दृष्टीने कठीण काळ सुरु आहे, अशा परिस्थितीत किमान मुख्यालयी रहावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.गोदाकाठ भागात चांदोरी, सायखेडा, म्हाळसाकोरे, भेंडाळी या गावात आरोग्य उपकेंद्र आहे, यापैकी भेंडाळी आणि चांदोरी या गावातील जिल्हा परिषद सदस्य आहे. सदस्य या गावातील असूनही त्या गावातील कर्मचारी मुख्यालयी रहात नाही, सदस्य यांच्या गावात अशी परिस्थिती तर इतर आरोग्य केंद्रात काय परिस्थिती असेल असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रात मुख्य आरोग्यसेविका, असिस्टंट डॉक्टर, आणि एक नर्स असे कर्मचारी कार्यरत आहेत. यातील बरेच कर्मचारी सकाळी दहा वाजता मुख्यालयी येतात आणि सायंकाळी सहा वाजेनंतर निघून जातात. सद्या कोविडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या काळात ग्रामीण भागात रात्री अपरात्री साधारण ताप, सर्दी, खोकला आणि इतर समस्या निर्माण होऊ शकतो. अशा पेशंटचा तात्काळ रिपोर्ट करणे गरजेचा आहे, मात्र कार्यालयात कर्मचारीच नसल्याने समस्या कोणाला सांगणार असा प्रश्न वारंवार निर्माण होत आहे. त्यामुळे किमान कोविडचा प्रादुर्भाव सुरु असल्यामुळे कर्मचारी यांनी मुख्यालयी राहून नागरिकांना तात्काळ सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली जात आहे.आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र येथे सायंकाळी नागरिक तपासणीसाठी किंवा औषध घेण्यासाठी गेले असता दवाखाना बंद आढळून येतो, कर्मचारी मुख्यालयी रहात नाही कोविड सारख्या महामारीच्या काळात आरोग्य विभाग सतर्क असला तरी ग्रामीण भागात मात्र वेगळे चित्र पाहायला मिळत आहे, जिल्हा परिषद सदस्य यांच्या गावातील कर्मचारी मुख्यालयी रहात नाही हे दुर्दैव आहे.- नितीन सातपुते, ग्रामस्थ, भेंडाळी.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्य