शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
7
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
8
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
9
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
12
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
13
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
14
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
15
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
16
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
17
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
18
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
19
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
20
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...

घासलेटचा पुरवठा बंद झाल्याने गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:16 IST

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून शहरासह ग्रामीण भागातील रॉकेल वितरण व्यवस्था शासन स्तरावरून ठप्प झाल्याने सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. घासलेट विना अनेकांच्या घरातील चुली पेटत नसून रात्री अंधारात जीवन जगावे लागत आहे.

साकोरा : गेल्या दोन-तीन महिन्यांपासून शहरासह ग्रामीण भागातील रॉकेल वितरण व्यवस्था शासन स्तरावरून ठप्प झाल्याने सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. घासलेट विना अनेकांच्या घरातील चुली पेटत नसून रात्री अंधारात जीवन जगावे लागत आहे.शासनाच्या पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून गरिबांसाठी दिल्या जाणाºया घासलेट वितरणात काळा बाजार फोफावला होता. त्यात अधिकारी व किरकोळ विक्रेत्यांनी कित्येक गावांचा संपूर्ण कोटाच शहरातच लंपास करून पैसा आपल्या घशात घातला. त्याच अनुषंगाने वरिष्ठ अधिकाºयांनी सहा महिन्यांपूर्वी नांदगाव तालुक्यातील सर्व चारशे किरकोळ विक्रेत्यांना एकत्रित करून बैठक घेतली. प्रत्येक गावातील गॅसधारकांची तसेच शिधापत्रिकांच्या याद्या मागविण्यात आल्या. तसेच प्रत्येक डिलरकडून घोषणापत्र बनवून घेतले. त्यात फक्त साकोरा येथील तीन विक्र ेत्यांनी सदोष याद्या दिल्या. मात्र इतरांनी दिल्याच नसल्याने संपूर्ण तालुक्याचा रॉकेलचा पुरवठा बंद करण्यात आला असल्याचे एक खात्रीलायक वृत्त आहे. साकोरा गावात तीन हजार चारशे शिधापत्रिका तर चाळीस टक्के बिगर गॅसधारक आहेत. त्यानुसार सतराशे लीटरचा पुरवठा होणे आवश्यक असताना गेल्या काही वर्षांपासून पुरेसा पुरवठा होत नाही. सदर घासलेट जाते कुठे असा प्रश्न लाभार्थींना पडला आहे. पैकी साकोरा गावासाठी जून महिन्यात अवघा ४०२ लीटर रॉकेल मिळाले. त्यात ते चुटकीसरशी संपून गेले कारण या महिन्यात गावात अनेकांचे निधन झाले. त्यामुळे अंत्यसंस्कारसाठी घासलेटचा अधिक वापर झाला. शासनाला या गोष्टीशी काही देणे- घेणे नसल्याचे दिसून येत आहे. आता तर गॅस सिलिंडरच्या भाव दर महिन्याला वाढणार असल्याने सामान्य जनतेने जगायचे कसे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून घासलेटचा कोटा उपलब्ध न झाल्याने लाभार्थींची उपासमार होताना दिसून येत आहे.