शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दाखले बंद झाल्याने गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:30 IST

अधिकार नसतानाही गेल्या अनेक वर्षांपासून निव्वळ जनतेची गैरसोय टाळण्यासाठी तलाठी, मंडळ अधिकाºयांंकडून दिले जाणारे विविध प्रकारचे शासकीय व कृषी दाखले देण्यास गेल्या दहा दिवसांपासून बंद करण्यात आल्याने या दाखल्यांअभावी नागरिकांची शासकीय कामांसाठी गैरसोय होऊ लागली असून, त्याचा फटका शैक्षणिक कारणांसाठी विद्यार्थ्यांना बसू लागला आहे. दाखल्यांसाठी नागरिकांची वणवण होत असताना जिल्हा प्रशासनातील अधिकारी मात्र हातावर हात धरून बसले आहेत.

नाशिक : अधिकार नसतानाही गेल्या अनेक वर्षांपासून निव्वळ जनतेची गैरसोय टाळण्यासाठी तलाठी, मंडळ अधिकाºयांंकडून दिले जाणारे विविध प्रकारचे शासकीय व कृषी दाखले देण्यास गेल्या दहा दिवसांपासून बंद करण्यात आल्याने या दाखल्यांअभावी नागरिकांची शासकीय कामांसाठी गैरसोय होऊ लागली असून, त्याचा फटका शैक्षणिक कारणांसाठी विद्यार्थ्यांना बसू लागला आहे. दाखल्यांसाठी नागरिकांची वणवण होत असताना जिल्हा प्रशासनातील अधिकारी मात्र हातावर हात धरून बसले आहेत.दैनंदिन शासकीय कामासाठी लागणारे उत्पन्न, वारस, रहिवास यासह जवळपास वीस प्रकारचे दाखले आजवर तलाठी व मंडळ अधिकाºयांकडून दिले जात होते. परंतु मध्यंतरीच्या काळात काही न्यायिक प्रकरणांमध्ये न्यायालयांनी तलाठी, मंडळ अधिकाºयांना धारेवर धरत नोटिसा काढल्या तसेच शासनालाही नोटिसा बजावून तलाठ्यांना कायदेशीर अधिकार नसताना दाखले देण्याचे कारण काय, अशी विचारणा केली होती. मुळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तलाठ्यांकडून आपल्याच अधिकारात सदरचे दाखले दिले जात असताना त्यातून वाद होऊ लागल्याने तलाठ्यांच्या राज्यस्तरीय संघटनेने २ आॅक्टोबरपासून कोणतेही दाखले देण्यास नकार दिला आहे. तलाठ्यांच्या या कृतीमुळे मात्र सामान्य जनता व विशेष करून शेतकरी वर्गाची मोठी अडचण निर्माण झाली आहे. रहिवास, उत्पन्न, वारसाची नोंद, शेतजमिनीचा नकाशा, विभुक्त कुटुंबाचा दाखला, विभक्त कुटुंब दाखला, वंशावळ पंचनामा, नातेसंबंधांचा दाखला, शेतकरी असल्याचा दाखला, भूमिहीन असल्याचा दाखला, शेतमजुराचा दाखला अशा विविध प्रकारचे दाखले मिळणे बंद झाले आहे. सदरचे दाखले घेण्यासाठी नागरिक तलाठी कार्यालयात गेल्यावर त्यांना स्पष्ष्टपणे नकार दिला जात असून, तहसीलदारांकडून अशाप्रकारचे दाखले देण्याचे अधिकार आपल्याला नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सदरचे दाखले कोण देईल व कोठे मिळतील, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.