शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ८०० शेतकऱ्यांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 00:21 IST

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी राज्य सरकारने जाहीर केली असून, पहिल्या यादीत नाशिक जिल्ह्यातील सोनांबे आणि चांदोरी या दोन गावांमधील शेतकºयांना या योजनेचा लाभ होणार आहे. या दोन्ही गावांतील ७७८ पात्र शेतकºयांची यादी पोर्टलवर जाहीर करण्यात आली असून, जिल्ह्यातील एक लाख ४७ हजार शेतकºयांना योजनेचा लाभ होणार आहे. योजनेतील दुसरी यादी २८ तारखेला जाहीर केली जाणार आहे.

ठळक मुद्देकर्जमुक्ती योजनेची पहिली यादी : सोनांबे, चांदोेरीतील शेतकऱ्यांना लाभ

नाशिक : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी राज्य सरकारने जाहीर केली असून, पहिल्या यादीत नाशिक जिल्ह्यातील सोनांबे आणि चांदोरी या दोन गावांमधील शेतकºयांना या योजनेचा लाभ होणार आहे. या दोन्ही गावांतील ७७८ पात्र शेतकºयांची यादी पोर्टलवर जाहीर करण्यात आली असून, जिल्ह्यातील एक लाख ४७ हजार शेतकºयांना योजनेचा लाभ होणार आहे. योजनेतील दुसरी यादी २८ तारखेला जाहीर केली जाणार आहे.दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकºयांचे कर्जमाफ करण्याच्या कर्जमुक्ती योजनेंतर्गत मुख्यमंत्र्यांनी मुंबईतून राज्याची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांमधील पात्र लाभार्थींना लाभ दिला जाणार आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सोनांबे आणि निफाड तालुक्यातील चांदोरी गावांमधील शेतकºयांना कर्जमुक्तीचा लाभ पहिल्या टप्प्यात दिला जाणार आहे.या दोन्ही गावांतील शेतकºयांचे आधार प्रमाणीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. आधार प्रमाणीकरणाचे काम आपले सरकार केंद्रांवर व संबंधित बॅँकांच्या शाखेत करण्यात येत आहे. ज्यांचे प्रमाणीकरण झाले आहे त्यांना प्रमाणपत्रदेखील दिले जात असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी दिली. येत्या दोन दिवसांत शेतकºयांच्या कर्जखात्यात कर्जमुक्ती योजनेची दोन लाखांची रक्कम जमा होणार आहे. कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यातील १ लाख ४७ हजार १०७ लाभार्थ्यांपैकी सुमारे सात हजार बॅँक कर्जदारांची खाती आधारलिंक नसल्याने त्यांचे खाते आधारलिंक करण्याची व्यापक मोहीम राबविण्यात आली. महसूल यंत्रणेवर आधारलिंक करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी गावागावात जाऊन कर्जखाते आधाराशी लिंक करण्यासाठी विशेष मोहीम राबविली. शेतकºयांच्या घरी जाऊन त्यांचे खाते आधारलिंक करवून घेतले. सद्यस्थितीत जिल्हा बँकेचे ६८, तर अन्य बँकांचे ३३० कर्ज खातेदारांचे अजूनही आधारलिंक झालेली नाहीत. चांदोरीतील ५२० शेतकºयांची नावे पहिल्या यादीत आली आहेत. त्यातील २१२ शेतकºयांचे, तर सोनांबे गावातील २५८ लाभार्थ्यांपैकी १५१ कर्ज खातेदारांचे आधार प्रमाणीकरण केले जात आहे.

कर्जमुक्ती योजना ही बॅँकांचा एनपीए करण्यासाठीची योजना नाही तर शेतकºयांना कर्जमुक्त करण्यासाठीची आहे. कर्जमुक्तीच्या लाभानंतर कर्जदार म्हणून बॅँका शेतकºयांची नवीन कर्जासाठी अडवणूक करणार नाहीत याची काळजी जिल्हा प्रशासनाकडून घेतली जाणार आहे. कर्जमुक्तीनंतर शेतकरी नवीन कर्जासाठी पात्र होतील.- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रMONEYपैसा